चिमूर मध्ये जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस अधीक्षक.. — विधानसभा मतमोजणी केंद्राची माहिती घेत केली पहाणी…  — अति दक्षता घेणे सुरू?

प्रदीप रामटेके 

  मुख्य संपादक 

            चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विनय गोंडा,पोलिस अधीक्षक सुदर्शन मुम्मका यांनी आज चिमूर येथे भेट दिली व विधानसभा मतमोजणी केंद्राची पाहणी केली आणि चिमूर विधानसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी किशोर घाडगे यांच्या कडून सविस्तर माहिती घेतली.

           यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी राकेश जाधव,तहसीलदार श्रिधर राजमाने,पोलिस निरीक्षक संतोष बकाल,पि.एस.आय.फुलकर आदी उपस्थित होते.

           चिमूर विधानसभा मतदारसंघ अति महत्वाचा झाला असल्याने या मतदारसंघाकडे महाराष्ट्र राज्यासह देशाचे लक्ष लागून आहे.

           तद्वतच भांडवलदार असलेल्या आमदार किर्तीकुमार भांगडीया यांनी निवडणूक जिंकण्यासाठी साम-दाम-दंड-भेद नितिचा वापर केला असल्याच्या खमंग चर्चा जनमानसात सुरू आहेत.

        मात्र त्यांच्या नितीला बहुसंख्य मतदारांनी नाकारले असून त्यांनी दिलेल्या आश्वासनाला सुध्दा चिमूर मतदार संघातील बहुसंख्य मतदारांनी यावेळी नाकारले आहे.

           यामुळे या निर्वाचन क्षेत्रात काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ.सतीश वारजूकर जिंकणार असल्याचे एक्झिट पोलचे निष्कर्ष पुढे आल्याने,स्थानिक प्रशासन व जिल्हा प्रशासन दक्ष झाले असल्याचे दिसून येत आहे.

          म्हणूनच मतमोजणी वेळी डॉ.सतीश वारजूकर आणि आमदार किर्तीकुमार भांगडीया यांच्या पदाधिकाऱ्यांत व कार्यकर्त्यांत कुठल्याही प्रकारची झडप होवू नये याकडे पोलिस विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे.

          याचबरोबर चंद्रपूर जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी चिमूर विधानसभा मतदारसंघाकडे विशेष लक्ष ठेवणे गरजेचे आहे असे चिमूर विधानसभा मतदारसंघातील मतदार बोलू लागले आहेत.