भाजपाला मत द्या म्हणत,मतदानाच्या दिवशी मौजा कोटगाव येथे मतदारांना बंद दार रुपये वाटणारा तो बाहेरचा व्यक्ती कोण? रुपयांची बॅग तपासू दिली नाही… — सैनिक बलाच्या संरक्षण तुकड्या रुपये वाटणाऱ्या चोर व्यक्तीला सोडून,मताचे व लोकशाहीचे संरक्षण करणाऱ्यांना अटक करण्यासाठी बोलाविण्यात आल्या आहेत का? — प्रकरण अंगलट येणार हे लक्षात येताच रुपयांची बॅग घेऊन तो रुपये वाटणारा व्यक्ती झाला पसार..‌ — चिमूर विधानसभा मतदारसंघातील घटना गंभीरच…

प्रदीप रामटेके 

 मुख्य संपादक 

        विधानसभा निवडणूक अंतर्गत मताधिकार बजावण्याचा आज दिवस असताना बाहेर गावाचा व्यक्ती चिमूर तालुक्यातील मौजा कोटगाव येथे येतोय व मतदार यादी घेवून मतदारांना रुपये वाटतो आणि भाजपाला मते द्या म्हणतो,तो लोकशाहीला कलंकित करणारा नालयक व्यक्ती कोण याचा शोध चिमूर व भिसी पोलीस घेतील काय?

      बंद दार खोलीमध्ये त्याला रुपये वाटण्यास व भाजपाला मते द्या म्हणण्यास नियमानुसार मज्जाव करण्यासाठी स्थानिक ग्रामपंचायत सदस्य व पत्रकार उपक्षम रामटेके आणि माजी सरपंच चरणदास वाघ गेले असता,तोच व्यक्ती हुज्जत घालताना व्हिडिओ मध्ये दिसतो आहे व मी वरोरा येथील असल्याचे सांगतो आहे.

 कोटगाव तालुका चिमूर येथील आज सकाळी झालेला प्रकार

      भाजपाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आपल्या वरिष्ठांना कळविल्यावर मौजा कोटगाव येथे संरक्षण बलाचे शिपाई येतात आणि विचार न करता किंवा प्रकरणाची इत्यंभूत सत्य माहिती न घेता लोकशाहीचे जतन करणाऱ्या स्थानिक ग्रामपंचायत सदस्य व पत्रकार असलेल्या उपक्षम रामटेके यांना घरुन उचलण्याचा प्रयत्न करतात हे कितपत योग्य आहे?

          त्या सैनिकांना बेकायदेशीर कृती करायला लावणारे ते महाशय कोण आहेत?याची सखोल चौकशी चिमूर विधानसभा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केली पाहिजे.

        चिमूर विधानसभा मतदारसंघातंर्गत भाजपाला मते द्या म्हणून अनेक गावी रुपये वाटणाऱ्या त्या लोकांना संरक्षण कुणाचे आहे? 

           निष्पक्ष,निसंदेह, स्वतंत्रपणे आणि खुल्या विश्वसनीय वातावरणात निवडणुका पार पडल्या गेल्या पाहिजेत असा सर्वोच्च न्यायालयाचा सन २०१३ चा निर्णय आहे.याच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला हरताळ फासण्याचे काम केले जात आहे.

         मौजा कोटगाव येथे आज घडलेला प्रकार अनुसूचित व लोकशाहीच्या संकल्पनेला बाधा पोहोचविणारा असल्याने त्या व्यक्तीचा शोध पोलिसांनी घेतलाच पाहिजे व त्याला बेड्या ठोकल्याच पाहिजे..‌

        चिमूर निवडणूक अधिकाऱ्यांनी सुध्दा मौजा कोटगाव येथील गंभीर घटनाक्रमाला समजून घेतले पाहिजे आणि संबंधित व्यक्तीला कायदेशीर चौकटीत आणले पाहिजे.