नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले
साकोली : भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या नागपूर विभागातील साकोली शाखेत मागील आर्थिक वर्षात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अभिकर्त्यांचा साकोली शाखेतील सहायक शाखाधिकारी किशोर डोंगरे यांच्या हस्ते ( दि. १७ मे ) रोजी कार्यालयात ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला. या सत्कार समारोह प्रसंगी आकर्षणाचा केंद्रबिंदू साकोली शाखेतील विमा अभिकर्ता म्हसवानी, ता. सडक अर्जुनी रहिवासी प्रमोद ठाकरे हा ठरला.
प्रमोद ठाकरे यांनी मागील आर्थिक वर्षात आयुर्विमा क्षेत्रात जुलै २०२२ पासून मार्च २०२३ या ९ महिन्याच्या अल्पशा कालावधीत अतिशय उल्लेखनीय कार्य करीत ग्रामीण भागातील जनतेच्या ८५ विमा पॉलिसी पुर्ण केल्या आहेत. त्यांच्या या सफलतापूर्वक कार्याबद्दल त्याचे सर्वच स्तरांवर विशेष कौतुक केले जात आहे. प्रमोद ठाकरे हे सहयोग बँकेत डेली कलेक्शनचा काम करणारे अभिकर्ता असुन यांच्या जवळ आज सहयोग बँकेचे बरेच खाते आहेत. प्रमोद ठाकरे यांनी आपल्या डेली कलेक्शनचा फायदा घेत आयुर्विमा क्षेत्रात प्रवेश केला व आपल्या कौशल्याच्या बळावर खोडशिवणी, गिरोला, घटेगाव, घोटी, डव्वा या भागात डेली कलेक्शनच्या माध्यमातून विमा पॉलिसी खीचून आणल्या आहेत. त्यांनी आपल्या कौशल्याचा पुरेपूर वापर करीत सडक अर्जुनी भागात आपल्या विमा एजन्सी चा प्रचार करीत ग्रामीण भागातील लोकांना पॉलिसी विषयी सेवा देण्याचे महत्वपुर्ण काम सुरू केले आहे.
तसेच सडक अर्जुनी परीसरातील पंधरा ते वीस किलोमिटर वरील सर्व क्षेत्रातील लोकांना आयुर्विमा विषयी सेवा देण्याचे महत्वपुर्ण कार्य प्रमोद ठाकरे यशस्वीपणे पूर्ण करीत असून त्यांच्या या कार्याची चर्चा सडक अर्जुनी क्षेत्रात होत आहे. विमा क्षेत्रात प्रमोद ठाकरे यांनी स्वतःचे एक लक्ष्य ठरवून नवीन पॉलिसी स्पर्धेत ज्या पद्धतीने कार्य करीत लोकांना विमा सुरक्षा देण्याकरिता पॉलिसी केल्या आहेत ते पाहता साकोली शाखेतील सहायक शाखाधिकारी किशोर डोंगरे यांनी प्रमोद ठाकरे यांचा त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल दिनांक १७ मे २०२३ ला झोनल मॅनेजर ट्रॉफी देऊन सत्कार केला.
विमा क्षेत्रातील अवध्या ९ महिन्याचा कमी कालावधीत प्रमोद ठाकरे यांना जे यश मिळाले त्याचे श्रेय समुह प्रमुख पुजा कुरंजेकर यांना जाते. त्यांच्या लीडरशिप मध्ये प्रमोद ठाकरे यांनी विमा क्षेत्रात प्रगती केली आहे हे विशेष. तसेच प्रमोद ठाकरे यांनी आपल्या यशाचे श्रेय ग्रुप लीडर पुजा कुरंजेकर व साकोली शाखेत अभिकर्त्याचा उत्साह वाढविण्यासाठी महत्वपुर्ण भूमिका निभावणारे साकोली शाखेचे सहायक शाखाधिकारी किशोर डोंगरे यांना दिले आहे. याप्रसंगी प्रमोद ठाकरे यांचा ट्रॉफी देऊन सत्कार करतांनी सहायक शाखाधिकारी किशोर डोंगरे व साकोली शाखेचे उच्च श्रेणी सहायक सुधीर गायधने प्रामुख्याने उपस्थित होते. किशोर डोंगरे यांनी याप्रसंगी सांगितले की, पत संस्थेत किंवा बँकेत डेली कलेक्शनचे काम करणारे अभिकर्ता विमा क्षेत्रात चांगल्या प्रकारे काम करू शकतात व अशा अभिकर्त्यांना विमा क्षेत्रात प्रगती करण्यास बराच वाव मिळतो असे प्रतिपादन केले.