वैरागड येथील बेरोजगार तरुणांच्या आत्महत्येला सरकारची धोरणे आणि समाजव्यवस्था जबाबदार :- राज बन्सोड(आसपा)… — आसपाच्या वतीने मनीषला श्रद्धांजली..

ऋषी सहारे 

  संपादक

         वैरागड येथील सुशिक्षित बेरोजगाराने नौकरी, रोजगार मिळत नसल्याने बेरोजगारीला कंटाळून आत्महत्या केली. हे अत्यंत दुःखद बाब आहे. 

           याला जबाबदार कोण? सरकारने एका बाजूला शिक्षणाचा बाजारीकरण करून, कोणत्याही शिक्षणासाठी लाखो रुपये खर्च केल्याशिवाय शिक्षण पूर्ण होत नाही.

           गोर – गरीब जनता मोठ्या कष्टाने, मेहनतीने आपल्या पोरांना इतका खर्च करून शिक्षण शिकवितात आणि शिकून झाल्यानंतर या सरकारच्या भांडवलदार धोरणामुळे तरुणांच्या हाताला रोजगार मिळत नाही.

            शिकून रोजगार मिळाला नाही तर या समाजव्यवस्थेत घरून- बाहेरून ज्या पद्धतीने वागणूक मिळते त्यामुळे बेरोजगारांना या समाजात जगताना अडचणीचे वाटू लागते. कारण या समाज व्यवस्थेत नौकरीवाल्या लोकांचा जेवढा मान सन्मान होतो त्याच्या दुप्पट सुशिक्षित बेरोजगारांचा अपमान केल्या जातो. याचा परिणाम म्हणजे वैरागड येथील तरुण बेरोजगार मनीष खोब्रागडे यांनी केलेली आत्महत्या आहे.

           त्यामुळे ही आत्महत्या नसून सरकारचे चुकीचे धोरण आणि या समाजव्यवस्थेने घेतलेला बळी आहे, असा आरोप आजाद समाज पार्टीच्या वतीने करण्यात येत आला आहे. 

          आवाहन करण्यात येते की अशाप्रकारचे व्यवस्थेशी तमाम बेरोजगार मित्राना लढावं लागणार आहे. हा लढा उभा करण्याची ताकद आपण सर्वांनी आम्हाला मतदानाच्या रूपाने द्यावी असे आवाहन राज बन्सोड यांनी केले आहे.