सुधाकर दुधे
सावली तालुका प्रतिनिधी
सावली :- २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत अबकी बार महंगाई पे वार, म्हणून मोदी सरकारने खोटे बोलून सत्तेवर येताच देशातील मोजक्या उद्योगपतींचे हित जोपासत प्रचंड महागाई वाढविली.
तर राज्यात फडणवीस व त्यानंतरच्या घटनाबाह्य खोके सरकारने राज्यातील शेतकरी, शेतमजूर,कामगार, नोकरदार यांचा भ्रमनिरास केला. लोकसभेत फटका बसला म्हणून लाडकी बहिण योजना आणली पण आता याच योजनेवरून हे भाजपवाले महिला भगिनींना धमकावत आहे.
भाजप खासदार महाडिक यांनी भर सभेत 1500 रुपये घेऊन काँग्रेसच्या मेळाव्यात जाणाऱ्या महिलांवर लक्ष ठेवा, फोटो काढा सांगितले इतकेच नाहीतर त्यांची व्यवस्था करतो अशी धमकी दिली. भाजप काय आपल्या खिशातून राज्यातील महिलांना निधी देत आहे का?
महिलावर राज्यात वाढलेले अत्याचारांचे प्रमाण हे महायुती सरकारचे महापाप आहे .म्हणूनच महायुती सरकारला सत्तेतून हाकलून लावा. अशी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते, तथा ब्रम्हपुरी विधानसभेचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले.
आयोजित कार्यक्रमास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव तथा माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष संदीप पाटील गड्डमवार,जेष्ठ नेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य गडचिरोली ऍड.रामभाऊ मेश्राम, तालुका अध्यक्ष नितीन गोहने,शहराध्यक्ष विजय मुत्यालवार, नगराध्यक्ष सौ.लताताई लाकडे, जेष्ठ पदाधिकारी प्रकाश पाटील राईंचवार, माजी सभापती पंचायत समिती सावली विजय कोरेवार, माजी सभापती प.स.कृष्णा राऊत,सामाजिक कार्यकर्ते गोपाल रायपूरे,युवा शहर अध्यक्ष अमर कोणपत्तीवार,महिला शहर अध्यक्षा सौ.भारती चौधरी,जेष्ठ पदाधिकारी प्रशांत राईंचवार,राजू राऊत नगरसेवक, नगरसेविका,पदाधिकारी ,कार्यकर्तागणं, नागरिक बहुसंखेने उपस्थित होते.
पुढे बोलतांना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, देशातील व राज्यातील हे महापापी सरकार उद्योगपतीचे कर्ज माफ करते पण शेतकऱ्यांना मात्र देशोधडीला लावले आहे.
मोदी सरकार आले तेव्हा तर पंधरा लाख देऊ असे आश्वासन दिले आता १५०० रुपये दिले आणि गाजावाजा करत आहेत.ब्रह्मपुरी मतदारसंघातील शेतकऱ्यांसाठी गोसेखुर्द प्रकल्पाचे ५ हजार कोटीचे काम आघाडी सरकार असताना सुरू केले. या प्रकल्पाला निधी मिळावा म्हणून झगडावे लागले.
यामुळे संपूर्ण क्षेत्रातील 80% शेती ओलिताखाली आली आहे.राज्यात सर्वाधिक ७००० पेक्षा जास्त घरकुल एकट्या ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात एन.टी समाजाला मिळाले, तसेच मतदारसंघातील रस्ते, घरकुल योजना, शैक्षणिक दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांकरिता वस्तीगृहे, वाचनालय, गावागावात सामाजिक सभागृहे, शुद्ध पेयजल योजना, क्रीडांगणाचा विकास, आरोग्य व प्रशासकीय सेवेसाठी प्रशस्त इमारती यासाठी आमदार म्हणून आपल्या कामाचा लेखाजोगा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मांडला.
सावली मध्ये मी लोकप्रतिनिधी नाही तर तुमचा भाऊ म्हणून काम करतो, भगिनींच्या पाठीशी वेळोवेळी उभा राहील तसेच महाविकास आघाडीचे सरकार आल्यास महापुरुषांचा विचाराचा वारसा पुढे नेत महाराष्ट्र राज्य सुजलाम सुफलाम करू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.