इंदापूर येथे अजित पवार यांची दत्तात्रय मामा भरणे यांचेसाठी आज सोमवारी प्रचाराची सांगता सभा… — जुनी मार्केट कमिटीच्या मैदानावर 11.30 वाजता होणार!.. — उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार… — तर सांगता सभेमध्ये अजित पवार कोणावर तोफ डागणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागणार…  

 बाळासाहेब सुतार

निरा नरसिंहपुर प्रतिनिधी

               राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार पक्षाचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची पक्षाचे उमेदवार दत्तात्रेय मामा भरणे यांच्या प्रचाराची सांगता सभा इंदापूर येथील जुणी मार्केट कमिटीच्या भव्य मैदानावरती आज सोमवारी (दि.18) दुपारी 11.30 वा. आयोजित करण्यात आली आहे. 

         या सभेला प्रमुख उपस्थिती अजितदादा पवार उपस्थित राहणार आहेत. 

          उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे इंदापूर तालुक्यावर विशेष लक्ष असल्याने ते या सभेत विरोधकांवर कोणती तोफ डागणार ? याकडे जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.

           सध्या अनेक कार्यकर्ते व ग्रामस्थांचे अजितदादा पवार यांच्या पक्षाला दत्तात्रय भरणे मामा यांना शेकडो कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी पक्ष प्रवेश केल्यामुळे अजित दादा पवार यांच्या पक्षाची इंदापूर तालुक्यामध्ये चांगलीच लाट निर्माण झालेली आहे. 

         तसेच दत्तात्रय मामा भरणे यांचे बद्दलही मतदारांमध्ये सहानुभूती दिसून येत आहे. राज्यामध्ये महायुतीचे सरकार सत्तेवर येणार असल्याचे स्पष्ट दिसु लागलेले आहे. 

          उप मुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी केलेल्या राज्यव्यापी निवडणुक प्रचार दौऱ्यास जनतेकडून प्रचंड मोठा प्रतिसाद मिळाला आहे. महाराष्ट्रात सत्ता येणारच आशी ग्वाही आजि पवार आज भाषणातून देनारच आहे. 

         गद्दारांना सुट्टी नाही असे ब्रीदवाक्य घेऊन महाराष्ट्रभर सभा गाजवलेले आजित पवार इंदापूरच्या प्रचाराच्या या सांगता सभेत काय बोलतात? याकडे इंदापूर तालुक्याचे लक्ष लागून राहीले आहे. 

         अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार पक्ष व महायुतीचे उमेदवार दत्तात्रय भरणे यांच्या प्रचारासाठी होणाऱ्या ऐतिहासिक सभेस इंदापूर तालुक्यातील नागरिकांनी प्रचंड संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आजित पवार पक्षाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

चौकट

            दत्तात्रय मामा भरणे यांचेबद्दल गेल्या काही दिवसांपासून जनतेमध्ये मोठी सहानभूती दिसून येत आहे. या सहानुभूतीमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली असून, दत्तात्रय भरणे यांचेसाठी जनतेने व युवकांनी निवडणूक हाती घेतल्याचे चित्र दिसत आहे. तसेच चांगलाच प्रतिसाद मिळू लागला आहे. 

           तसेच दुसऱ्या बाजूला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इंदापूरच्या या निवडणुकीत विशेष लक्ष घातले आहे, त्यामुळे इंदापूर तालुक्यातील वातावरण घड्याळमय झाले आहे. उपमुख्यमंत्री अजित दाद पवार यांच्या होणाऱ्या प्रचाराच्या या सांगता सभेने गावा-गावातील कार्यकर्त्यांना आणखी ऊर्जा प्राप्त होणार आहे.