
प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख नेतृत्व हे निष्कलंकीत असून स्वाभिमानी वृत्तीचे आहे.स्वत:च्या अस्मितेला जपत निर्भिडपणे कार्य करण्याची कार्यपध्दत मी माझ्या नेतृत्व प्रमुखांची बघितली आहे.यामुळे वंचित बहुजन आघाडी पक्षात काम करताना मनस्वी समाधान व आनंद मिळतो आहे..
मनाचा ठाव घेणारे व हृदयाच्या कोपित स्थिरावणारे वक्तव्य आहेत माजी राज्यमंत्री व वंचित बहुजन आघाडीचे पुर्व विदर्भ विभागीय प्रमुख समन्वयक डॉ.रमेशकुमार गजबे यांचे.
दखल न्यूज भारतचे मुख्य संपादक प्रदीप रामटेके यांनी माजी राज्यमंत्री तथा वंचितचे विभागीय प्रमुख समन्वयक डॉ.रमेशकुमार गजबे यांची त्यांच्या निवासस्थानी प्रत्यक्ष भेट घेऊन आस्थेंनी विचारपूस केली व चळवळी बाबत दिलखुलास चर्चा केली.
डॉ.रमेशकुमार गजबे
डॉ.रमेशकुमार गजबे हे सुद्धा निष्कलंकीत व्यक्तित्व व चितपरिचित नेतृत्व.माजी राज्यमंत्री डॉ.रमेशकुमार गजबे हे एमबीबीएस एमडी असतांना त्यांच्यात अहंकाराचा जराही लवलेश नाही.तद्वतच ते साध्या राहणीमानाचे असून त्यांच्यातील विनंम्रभाव मनाला संवेदनशील करणारा आणि बौद्धिक क्षमतेला गतिमान करणारा आहे.
त्यांचे राष्ट्रीय पक्ष नेतृत्व म्हणजे वंचितचे सर्वेसर्वा अॅड.प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर होत.
आपल्या पक्ष नेतृत्वाच्या बाबतीत माहिती देताना मन खुले केले व सांगितले की अॅड.प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकरांसारखे स्वाभिमानी व निष्कलंकीत व्यक्तित्व अनुभवताना अनेक प्रसंगानुरूप बरेच काही शिकण्यासारखे आहे.
कोणत्याही सार्वत्रिक निवडणुका अंतर्गत उमेदवारांकडून एबी फार्मचा एक रुपया न घेता त्यांच्यात निवडणूक लढण्याची नवी उमेद जागवणारे व याच उमेदी अन्वये नवीन वैचारिक ऊर्जा पक्ष उमेदवारांत निर्माण करणारे अस्मिता दर्शक नेतृत्व बाळासाहेबांच्या रुपात पहिल्यांदा बघितले.
राज्य व राष्ट्रीय ध्येय धोरणांतर्गत आणि घडामोडी अंतर्गत तोलून बोलणे,योग्य तेच बोलणे,पक्ष पदाधिकाऱ्यांसी व पक्ष कार्यकर्त्यांसी प्रत्यक्ष बोलून माहिती घेणे,हा स्वभाव गुण फार कमी नेतृत्वात आहे.
चर्चा दरम्यान अनेक बाबतीत खुलासेवार संवाद करताना डॉ.रमेशकुमार गजबे यांनी सांगितले की पुर्व विदर्भातून विधानसभेच्या ३२ जागांपैकी १६ जागांवर माझी बारीक नजर असून त्या विधानसभा निर्वाचन क्षेत्राचा संपूर्ण अभ्यास मी केला आहे व १६ विधानसभा निर्वाचन क्षेत्रातंर्गत निवडणूक जिंकण्याची मी तयारी केली आहे.
परत्वे त्यांनी स्पष्ट केले की २०१९ च्या विधानसभा निवडणुकांवेळी आमची पुर्व तयारी नव्हती यामुळे आम्ही गडबडलोय.आता वंचितकडे आवश्यक उमेदवार असून पुर्व विदर्भातील प्रत्येक विधानसभा निर्वाचन क्षेत्रात बारीक लक्ष ठेवून असल्याचेही ते म्हणाले.
वंचितचे विभागीय प्रमुख समन्वयक डॉ.रमेशकुमार गजबे हे अभ्यासू,समजदार,शांत,स्वयंशिस्त,निष्कलंकीत व्यक्तित्व आहे आणि महाराष्ट्र राज्यातंर्गत सामाजिक व राजकीय स्तरावर आपली आगळावेगळी छाप सोडणारे चारित्र्य संपन्न नेतृत्व आहे.