१६ नोव्हेंबरला देशाचे विरोधी पक्षनेते खा.राहुल गांधी चिमूरात तर १७ नोव्हेंबरला काँग्रेसच्या राष्ट्रीय महासचिव प्रियांका गांधीं वडसा (देसाईगंज) मध्ये..‌‌.. — प्रचार सभेत लोकहिताच्या विचारांची तोफ धडधडणार!..

       रामदास ठुसे 

विशेष विभागीय प्रतिनिधी 

चिमूर:-

       महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी मैदानात…

       चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील विधानसभा उमेदवारांच्या विजयासाठी राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी कंबर कसली आहे. 

        महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी करण्याचा एक कार्यभाग म्हणून चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेस पक्षासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे.तद्वतच क्रांतीभूमी चिमूर येथे १६ नोव्हेंबरला सकाळी ठिक ११ वाजता,सेंट क्लारेट शाळे जवळील मैदानात देशाचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांची प्रचार सभा होणार आहे.

        तर अतिदुर्गम,आदिवासी बहुल अशा गडचिरोली जिल्ह्यातील वडसा येथे येत्या १७ नोव्हेंबरला महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची तोफ धडाडणार आहे.

      काँग्रेस पक्षाने सर्व धर्मसमभाव विचारधारे अंतर्गत समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी नेहमीच भूमिका घेतली.

       महाराष्ट्रात दोन पक्ष फोडून भाजपने सत्ता स्थापन केली.अशा या महायुती सरकारला सत्तेतून हद्दपार करण्यासाठी औद्योगिक क्षेत्र म्हणून परिचित असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील क्रांतीभूमी चिमूर येथे जातीय विषमता,व यातून निर्माण झालेली अराजकता दूर करण्यासाठी १६ नोव्हेंबरला काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी येणार आहेत.

          तर वनसंपदेने नटलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासीं संस्कृती जतन करण्यासाठी,आदिवासीं बांधवांच्या,महिला भगिनी,युवक,युवतींच्या समस्या जाणण्यासाठी व सोडविण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय नेत्या प्रियांका गांधी येत्या १७ नोव्हेंबरला महाविकास आघाडी उमेदवारांच्या प्रचारार्थ गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी विधानसभा मतदारसंघातील वडसा येथे येत आहेत.त्यांची तिथे उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य सभा होणार आहे.

        आयोजीत सभेस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे महत्वाचे नेते,जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी व महाविकास आघाडी व सर्व घटक पक्षाचे नेते,चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील सर्व उमेदवार,पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. 

       या जाहीर सभेस जास्तीत जास्त संख्येने नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन चंद्रपूर व गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.