ऋषी सहारे
संपादक
आरमोरी – आज दिनांक 14 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 10:30 सार्वत्रिक विधानसभा निवडणूक सन 2024 च्या अनुषंगाने पोलीस स्टेशन आरमोरी हद्दीतील मौजा- आरमोरी शहरात रूट मार्च काढण्यात आला.
सदर रूट मार्च पोस्टे आरमोरी परिसरातून जुना बस स्टँड आरमोरी, भगतसिंग चौक, पंचायत समिती कार्यालय आरमोरी, शक्ती नगर टी पॉईंट, गायकवाड चौक, आझाद चौक, अशोक सम्राट चौक, पटेल चौक, शिवाजी चौक, विठ्ठल मंदिर चौक, राम मंदिर, दुर्गा माता मंदिर चौक, जमा मस्जिद गुजरी चौक, सुभाष वार्ड चौक, इंदिरा गांधी चौक, बौद्ध विहार ते दुपारी 12:25 वाजता पोलीस स्टेशन आरमोरी परत.
सदर रूट मार्चला जिल्हा पोलीस अधिकारी – पोनी.कैलास गवते, सपोनी. लामतुरे, पो उप नी / विजय चलाख, दिलीप मोहूर्ले तसेच राज्य राखीव पोलीस गट क्रमांक 13 वडसा देसाईगंज ए कंपनी व बी कंपनीचे 03 पोलीस अधिकारी व 70 पोलीस अंमलदार तसेच जिल्हा पोलीस अंमलदार 19 असे एकूण 7 अधिकारी व 89 अंमलदार यांनी सहभाग घेतला.