प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
माजी प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांचे पनतू,देशाचे माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांचे सुपुत्र आणि देशाच्या माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांचे नातू असलेले देशाचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी हे १६ नोव्हेंबर रोज शनिवारला काँग्रेस-महाविकास आघाडी उमेदवारांच्या प्रचारार्थ चिमूरला येत आहेत.
त्यांना बघण्यासाठी व ऐकन्यासाठी मतदारांत आणि नागरिकांत कमालीची उत्सुकता असून ते स्वतःच्या वाहनाने व पायदळ,सभा स्थळ गाठणार आहेत.
याचबरोबर शिवसेनेच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे या सुध्दा महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ १६ नोव्हेंबरला चिमूरला येत आहेत.त्यांची तोफ १६ नोव्हेंबरला धडधडणार असून भाजपाची कुंडली बाहेर काढणार असल्याची माहिती आहे.
काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष व देशाचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी हे जगप्रसिद्ध व्यक्तीमत्व असून त्यांच्याकडे जगातील विद्वान,प्रधानमंत्री,राष्ट्रपती,विरोधी पक्षनेते आदराने बघतात व तेवढाच मानसन्मान करतात..
खासदार राहुल गांधी हे भारतातील लोकप्रिय नेते असून ते करोडो नागरिकांचे आदर्श व आधारस्तंभ आहेत.
यामुळे भारत देशातील नागरिकांची नाळ त्यांच्या सोबत जिव्हाळाने जुळलेली आहे.राहुल गांधी म्हटले की देशातील नागरिकांचे जिव की प्राण असल्याने त्यांना ऐकन्यासाठी व बघण्यासाठी ३ ते ४ लाख नागरिकांची अफाट व प्रचंड गर्दी होणार असल्याची गोपनीय माहिती आहे.
चिमूर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार डॉ.सतिश वारजूकर,आणि इतर सर्व महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या विजयाबद्दल ते भाष्य करतील आणि भाजपाचा समाचार घेतली अशी चिन्हे आहेत.
शिवसेनेच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे यांचा सर्व विषयांवर अभ्यास असून त्या कायदेशीर व वास्तव घटनेला अनुसरून पोलपट्टी करण्यात तरबेज आहेत.
एकंदरीत खासदार राहुल गांधी यांचे चिमूर विधानसभा मतदारसंघात, विशेषतः इतिहासिक चिमूर नगरित पाऊल पडत असल्याने,पुढे चालून चिमूर इतिहासाच्या पानात फुललेले असेल..
खासदार राहुल गांधी असामान्य व्यक्तिमत्व असल्याने लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर ते देशाला व देशातील नागरिकांना तारण्यास यशस्वी ठरले आहेत.भारतात भाजपातर्फे भितीदायक वातावरण तयार करण्यात आले असताना,”त्यांचा भारतीय नागरिकांना,–“डरो मत,– हा संदेश नवीन उर्जा देऊन गेला आणि आत्मविश्वासाने जगण्याची उमेद जागवून गेला,हे वास्तव नाकारता येत नाही.
काही मातब्बरांची मस्ती न बोलताच त्यांनी जिरवली असून अति बोलबच्चनांची कुंडली सुध्दा त्यांनी बंद केली आहे.
खासदार राहुल गांधी एक आत्मविश्वासी,दृढ निश्चयी व सहज निर्णायक असल्याने ते देशातील नागरिकांना न्याय व हक्क जरुर मिळवून देतील असे भाकीत,”दखल न्यूज भारतचे,आहे…
मात्र चिमूरला होणारी खासदार राहुल गांधी यांची प्रचार सभा विजयी भव ठरणार आहे….यात तिळमात्र शंका नाही….