लोकशाही केवळ निवडणुकीपुरतीच नसते……
तर ती आमच्या व भावी पिढीच्या कायम उन्नतीची प्रक्रिया असते….
नरेंद्र मोदीजी,तुम्ही आमच्या भारताच्या एका दिवसाच्या सुद्धा लायकीचे प्रधानमंत्री नाही आहात….
कारण…………….
” 1979 च्या सप्टेंबर महिन्यातील एक संध्याकाळ. उत्तर प्रदेश मधील इटावा शहरातील उसराहार पोलीस स्टेशन.पोलीस निरीक्षक बाहेर गेलेले होते.पोलीस स्टेशनमध्ये एक उपनिरीक्षक,कॉनस्टेबल आणि काही हवालदार आपापसात चर्चा करत असतांना,अचानक एक शेतकरी, पायात काहीही नसलेला,मळलेल्या कपड्यांसहित,डोक्याला गमजा बांधलेला,कोणत्यातरी मोठ्या संकटात सापडलेला, हतबल होऊन प्रवेश करतो.
आणि उपस्थितांना केविलवाण्या शब्दात विनवणी करतो की,फौंजदार साहेब कुठे आहेत?
त्यावर तेथील मंडळी विचारते की, काय झाले? काय काम आहे? त्यावर तो उत्तरतो, ” मी मेरठचा शेतकरी आहे.गावी थोडीफार शेती आहे.बैल विकत घेण्यासाठी पॆसे नव्हते, म्हणून मी त्यातील थोडीशी शेती विकली,आलेल्या पैश्यातून थोडे काही शे रुपये घेऊन या इटावा गावामध्ये बैल चांगले मिळतात चौकशी केली होती.तसे बोलणे पण झाले होते.म्हणून मी पॆसे घेऊन इथे आलो असता कुण्या चोरट्याने माझा खिसा कापला आणि माझे सारे पॆसे घेऊन पळून गेला.तेंव्हा माझी तक्रार लिहून घ्या आणि माझे पॆसे मला परत मिळवून द्या.साहेब तुमचे माझ्यावर फार उपकार होतील…..
त्यावर पोलीस उपनिरीक्षक आणि सर्वांनी मिळून उलट त्यांनाच दम दिला,की तुम्हीच कुठेतरी पॆसे हरवलात,किंवा जुगारावर हरला असाल,किंवा दारूची उधारी दिली असाल,आणि घरी काय तोंड दाखवावं म्हणून हे नाटक घेऊन आमच्याकडे आलात काय?
असे म्हणून उलट त्या शेतकऱ्यालाच दमदाटी करुन तक्रार घेणार नाही म्हणून सक्त बजावले.शेतकऱ्याने पुन्हा पुन्हा विनंती केली, तरी सुद्धा त्यांनी तक्रार दाखल करुन घेण्यासाठी साफ नकार दिला.
शेवटी हतबल होऊन,शेतकरी पोलीस स्टेशनच्या बाहेर येऊन एका ओट्यावर उदास होऊन चिंताग्रस्त अवस्थेत बसून राहिला.प्यायला पाणि सुद्धा त्याला विचारण्यात आलं नव्हतं!
बराच वेळ असाच निघुन गेल्यानंतर पोलीस निरीक्षक पण आले होते.तेंव्हा एक हवालदार त्याच्याकडे आला आणि म्हणाला,” काका तुमची तक्रार घेतील,पण खर्चापाणी द्यावे लागेल.
असं म्हटल्याबरोबर शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर झळाळी आली,पण खर्चापाणि म्हटल्याबरोबर लगेच मावळली. हवालदाराने सांगितले वरच्या साहेब लोकांना पॆसे दिल्याशिवाय तुमची तक्रार नोंदवली जाणार नाही.हो,नाही,हो,नाही करत ही तडजोड शेवटी 35 रुपयावर झाली. आणि पोलीस निरीक्षक त्याची तक्रार लिहून घेण्यास तयार झाला.
मग पोलीस निरीक्षकासमोर एक कोंस्टेबल त्याची तक्रार लिहून घेत होता,तो शेतकरी सांगत होता. पॆसे कुठे चोरीला गेले,नोटा किती होत्या,वगैरे वगैरे….
जेंव्हा संपूर्ण तक्रार लिहून पूर्ण झाली,शेवटी पोलीस निरीक्षकाने ती संपूर्ण वाचली आणि त्या शेतकऱ्याला विचारले की,तुम्ही सही करणार की अंगठा उमटवणार?
त्यावर त्याने सांगितले की सही करणार,तेंव्हा त्याला पेन देण्यात आला.त्या पेनाने त्याने सही केली,त्याचबरोबर तिथेच टेबलवर इंक पॅड पण पडलेला होता.तो पॅड सुद्धा त्याने जवळ घेतला.ताबडतोब पोलीस निरीक्षकाला प्रश्न पडला की याने सही केल्यानंतर पॅड का जवळ करतोय?
त्याच्या मनातील प्रश्नाचे उत्तर त्याला लगेच शेतकऱ्याकडून मिळाले.त्या शेतकऱ्याने आपल्या मळक्या खमीसातून एक स्टॅम्प काढला, तो स्टॅम्प पॅडवर दाबून उचलला,आणि जिथे सही केली होती,त्या सहीवर तो स्टॅम्प उमटवला…..
फौजदाराने तो तक्रारीचा कागद हातात घेतला, चष्मा लावून तो स्टॅम्प आणि सही वाचू लागला,तेंव्हा त्याच्या पायाखालची हळू हळू जमीन सरकू लागली.
तो स्टॅम्प होता……..
प्रधानमंत्री भारत सरकार आणि सही होती चौधरी चरणसिंग..
सर्व पोलीस स्टेशन अवॉक झाले,शेतकऱ्याची वेळ आता त्यांच्यावर आलेली होती.
बातमी वाऱ्यासारखी पसरली…
जिल्हाधिकारी,एस.पी., आयुक्त,सर्व अधिकार अर्ध्या तासात आले,सोबतच प्रधानमंत्री यांच्या गाड्यांचा ताफाही आला,त्या ताफ्यातील आपल्या गाडीत बसून प्रधानमंत्री निघून गेले.जातांना ऊसराहार संपूर्ण पोलीस स्टेशनलाच निलंबित करण्याचा आदेश देऊन गेले!
माननीय प्रधानमंत्री चौधरी चरणसिंग..
इंदिरा गांधी यांच्या काँग्रेस पक्षाच्या पाठिंब्यावर 28 जुलै 1979 रोजी प्रधानमंत्री पदी विराजमान झाले.केवळ 23 दिवसातच इंदिरा गांधी यांनी काही कारणास्तव पाठिंबा काढला.आणि जनता पक्षाचे सरकार ज्याचे नेते चौधरी चरणसिंग प्रधानमंत्री होते,त्यांना राजीनामा द्यावा लागला,सोबतच त्यांनी लोकसभा भंग करण्याची शिफारस राष्ट्रपतीकडे केली.ती मान्यही होऊन लोकसभा भंग झाली. परंतू ,राष्ट्रपतीने त्यांना नवीन प्रधानमंत्री बनेपर्यंत काळजीवाहू प्रधानमंत्री म्हणून राहण्यास सांगितले.आणि ते जवळपास 24 आठवडे म्हणजे सहा महिने अर्थात 14 जानेवारी 1980 पर्यंत प्रधानमंत्री पदी होते.
तत्पूर्वी ते केंद्रीय गृहमंत्री,उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री सुद्धा राहिलेले होते.त्या काळात पश्चिम उत्तर प्रदेशमधील अनेक शेतकऱ्यांच्या पत्राद्वारे तक्रारी येत असत,शेतकऱ्यांना वाटे की,आपला माणूस प्रधानमंत्रीपदी पोहोचला आहे,आपल्या समस्या दूर करील म्हणून त्यांच्याकडे अनेक तक्रारी येऊ लागल्या की पोलीसवाले पॆसे घेतल्याशिवाय तक्रारी लिहून घेत नाहीत.म्हणून अशा अनेक तक्रारी या इटावातील उसराहार पोलीस स्टेशनच्या आलेल्या होत्या.
म्हणून एक दिवस प्रधानमंत्री यांचा ताफा इटावा वरून जात असतांना, त्या तक्रारीची आठवण झाली,आणि आपल्या सेक्रेटरीला सांगितले की, ” तुम्ही मला इथे एकटे सोडा,तुम्ही सर्वजण दूर कुठेतरी निघुन जा. सर्व निघून गेल्यानंतर तिथेच एका शेतकऱ्याचे कपडे धारण केले,जे मळके होते, डोक्याला फाटके व मळालेले मुंडासे बांधून,पायातील चप्पल तिथेच काढून टाकून, अशा पेहरावात प्रधानमंत्री चौधरी चरणसिंग इटावा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी गेलेले होते…
ज्या शेतकऱ्याला ( जो जगाचा पोशिंदा आहे ) आपला जवळचा माणूस प्रधानमंत्रीपदी पोहचल्यावर सुद्धा “तो ” आपला वाटत असेल,आणित्याने सुद्धा त्या मातीची नाळ जोडलेलीच असेल तर या देशात खऱ्या लोकशाही मूल्यांची अविष्कारीता होण्यास वेळ लागणार नाही.
या देशाच्या इतिहासात एकमेव असे हे प्रधानमंत्री होते. ज्यांनी असा इतिहास स्वकर्तृत्वाने रचला…..
आणि आजचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी त्याच शेतकऱ्यांच्या विरोधात संसदेत,विरोधकांना येन केन प्रकारे बाहेर हाकलून ती काळे कृषी कायदे पारित करता. त्या कृषी कायद्याच्या विरोधात हाच शेतकरी दीड वर्षे रस्त्यावर आंदोलन करतो.त्या काळात 750 च्या वर शेतकरी शहीद होतात.परंतु प्रधानमंत्री मोदी कधी त्यांचे गाऱ्हाने ऐकण्यासाठी चर्चा करत नाहीत,कधी शहीद झालेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी संसदेत प्रस्ताव मांडत नाहीत….
म्हणून…..
प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी तुम्ही या खंडप्राय भारत देशाच्या एका दिवसाच्या सुद्धा लायकीचे प्रधानमंत्री नाही आहात..
म्हणून महाराष्ट्रीयन मतदारांनो अशा केंद्र सरकारला साथ देणाऱ्या आणि राज्यातील सत्ताधाऱ्यांना खाली खेचण्यासाठीच मतदान करा….
तुमच्याच हातात सर्वकाही आहे…
कारण तुमच्या हातातील या मताच्या अधिकारात एवढी शक्ती आहे,की या नितिभ्रष्ट व्यवस्थेचा कडेलोट होऊन जाईल…..
जर कदाचित कडेलोट झालाच तरी आपण सर्वजण मिळून या EVM ला कायमचे गाडून टाकून आपल्या मताचा अधिकार सुरक्षित ठेऊ….
कारण हे संविधान आम्ही भारताचे लोक यांच्यासाठी आहे. आणि स्वतःप्रत अधिनियमित करुन अंगिकृत करण्यासाठी आहे….
असा निर्धार करुनच मतदान करा…..
*******
विनंती :- प्रत्येकांनी आजपासून 20 नोव्हेंबर पर्यंत मतदान जागृतीसाठी दररोज येणाऱ्या सर्व पोस्ट आपल्या मोबाईल मधील जेवढे व्हाट्सप गृपआणि मो. नं. असतील त्यावर अपलोड करुन व्हायरल कराव्यात…..
******