भ्रष्टाचार मिटविण्यासाठी व विकासकामे करण्यासाठी भाजपाच्या उमेदवाराला निवडून द्या.:- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी … — नक्षलवाद मिटवीला,गरिबांना घरे दिली,फुकट अनाज दिले,गाव तिथे रस्ता दिले,चिमूरच्या सभेतील प्रधानमंत्र्यांचे मनोगत.. — प्रधानमंत्र्यांनी १६ लाख लाभार्थ्यांचा आकडा कुठून आणला आणि भ्रष्टाचारमुक्त भारत कसा होणार? सभेचा सखोल परामर्श…. — सभेला मतदारांची व नागरिकांची प्रचंड उपस्थिती…

      रामदास ठुसे 

विशेष विभागीय प्रतिनिधी..

         महाराष्ट्र राज्यात संकल्प पत्रानुसार विकास आराखडा तयार करण्यात येणार असून,महाराष्ट्र राज्याचा विकास झपाट्याने करण्यात येणार आहे.यामुळे भाजपा महायुतीच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी चिमूरच्या जंगी सभेत आपल्या मार्गदर्शनातून उपस्थित मतदारांना केले.

      चिमूर येथे झालेल्या सभेला माजी केंद्रीय मंत्री व खासदार प्रफुल्ल पटेल,भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,महाराष्ट्र राज्याचे वने व सांस्कृतिक मंत्री ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार,माजी मंत्री शोभाताई फडणवीस,आमदार किशोर जोरगेवार,वरोरा – भद्रावती मतदारसंघातील उमेदवार करण देवतळे,ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार कृष्णलाल सहारे,राजुरा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार देवराव भोंगळे,माजी राज्यमंत्री डॉ.रमेशकुमार गजबे,माजी आमदार मितेश भांगडीया,चिमूर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार किर्तीकुमार भांगडीया,माजी खासदार अशोक नेते हे सभामंचवर उपस्थित होते.

        भारतीय जनता पक्ष व महायुतीच्या उमेदवार प्रचारार्थ चिमूर येथे आयोजित भव्य सभेला लाखोंच्यावर नागरिकांनी हजेरी लावली होती. 

        या सभेत प्रधानमंत्री श्री.नरेंद्र मोदी यांचे विचार ऐकण्यासाठी चंद्रपूर व इतर जिल्ह्यातून मतदार सभेला उपस्थित झाले होते.ही सभा महायुतीच्या विजयासाठी नवसंजीवनी ठरणार असा विश्वास अनेक नेत्यांनी व्यक्त केला.

     प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या मनोगतात सांगितले की त्यांनी नक्षलवाद मिटविला,लाखो लोकांना पक्के घरे दिली,देशातील नागरिकांना विनामूल्य अनाज दिले जात आहे,गाव तिथे रस्ता दिला,कान्पा ते वरोरा रेल्वे लाईन मार्ग मंजूर केलाय,पिएम किसान योजनांतर्गत १२ हजार रुपये देणे सुरू आहे.आणि इतर मुद्यावर भर दिला.

***

भ्रष्टाचार…

     पक्ष उमेदवारांच्या प्रचार सभेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचार मिटविण्यावर भर दिला.पण ज्या अजितदादा पवारांवर त्यांनी ७० हजार रुपये कोटींच्या भ्रष्टाचारांचा आरोप केला होता,त्यानाच महाराष्ट्राच्या राज्य सत्तेत सहभागी करून घेतले व त्यांना उपमुख्यमंत्री पद दिले.

         मग ते देशासह महाराष्ट्र राज्यातील भ्रष्टाचार कसा मिटविणार याबाबत मतदारात संभ्रमता निर्माण झाली आहे.

****

१६ लाख लाभार्थी कुठून आले…

     प्रधानमंत्री नरेंद्र मोदी चिमूर येथील सभेत बोलताना म्हणाले देशातील नागरिकांना,अन्नधान्य वितरण विभागाद्वारे विनामूल्य ५ किलो अनाज दर महिन्याला दिले जात आहे आणि फक्त चिमूरच्या १६ लाख नागरिकांना याचा लाभ होत आहे.

      प्रश्न हा पडतो की,चिमूर मतदारसंघाची लोकसंख्या ६ लाखांच्या घरात आहे.मग केवळ चिमूरात विनामूल्य अन्नधान्य घेणारे १६ लाख लाभार्थी आले कुठून?हा गोंधळवून टाकणारा मुद्दा नाही काय?

*****

विकास कसा होणार?

    भाजपाची विकास परिभाषा ही भांडवलदारांच्या हिताची आहे हे त्यांच्या आतापर्यंतच्या धोरणावरुन लक्षात आले आहे.

     तद्वतच महाराष्ट्र राज्यातील मोठे १७ उधोग गुजरातला नेले तर १ उधोग मध्यप्रदेश मध्ये नेलाय.

     मग ते महाराष्ट्र राज्यातील बेरोजगारांचा व नागरिकांचा विकास कसे करतील? हाही मुद्दा संभ्रमावस्था निर्माण करणारा आहे.

****

शेतमालाला भाव देणार!.‌..

      प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले शेतकऱ्यांच्या शेतीमालाला रास्त भाव देणार आहे,मग मागील १० वर्षं प्रधानमंत्र्यांना शेतकरी व शेतकऱ्यांचा पडून घेतलेला शेतमाल दिसला नाही का?

*****

गाव तिथे रस्ते दिले….

     प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले गाव तिथे रस्ते दिले‌‌.चिमूर तालुक्यात गाव तिथे रस्ते किती दिलेत?

    पक्के की कच्चे? कच्च्या रस्त्यांचे नागरिकांना व शेतकऱ्यांना काय काम? यावर मात्र त्यांचे भाष्य आले नाही.‌.

*****

संविधानाचे जतन केले…

     प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले आमच्या सरकारनी संविधाचे रक्षण केले.

       जेव्हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे संविधानुसार सरकारच चालवित नाही,सार्वत्रिक निवडणुका भारतीय संविधान अनुच्छेद ६१ (अ) नुसार घेत नाही तर त्यांच्या संविधान संरक्षण शब्दाला महत्त्व उरत नाही…

******

        आजच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत जोशात करण्यात आले.त्यांनी आपल्या भाषणात महायुतीच्या ध्येयधोरणांची सखोल माहिती दिली आणि महाराष्ट्रातील जनतेसाठी भाजप सरकारच्या विविध योजनांचा आढावा घेतला. 

      मोदींनी आपल्या भाषणात आदिवासी आणि वंचित घटकांच्या कल्याणासाठी करण्यात येणाऱ्या योजनांचा आवर्जून उल्लेख केला,ज्यामुळे सभेत उपस्थित नागरिकांचा प्रतिसाद उंचावला.

****

माजी खासदार तथा भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते यांचीही उपस्थिती..‌

    सभेत भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री हे देखील उपस्थित होते.त्यांनी मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारच्या कामगिरीचे कौतुक केले.

****

 विकासाचा संकल्प आणि पुढील योजना…

    प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी त्यांच्या भाषणात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या योजना,तरुणांसाठी नवनवीन रोजगार संधी,तसेच आदिवासी समुदायाच्या उत्थानासाठी भाजपा सरकारने केलेल्या प्रयत्नांवर प्रकाश टाकला.

      त्यांनी नवभारताच्या दिशेने पावले टाकण्याच्या दिशेने विकासाचा संकल्प पुनः दृढ केला.

****

चिमूर – महायुतीच्या प्रचाराची एक नवी सुरुवात..‌

     चिमूरमधील ही सभा,लोकांच्या समर्थनामुळे महत्त्वपूर्ण ठरली आहे.लाखों नागरिकांच्या या उत्साही प्रतिसादाने भाजप-महायुतीच्या विजयाची आशा पल्लवित झाली आहे.