संपादकीय
प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
भाजपा म्हणजे बिनबुडाचा बहुरंगी,बहुढंगी व बहुरुपी पक्ष.यामुळेच या पक्षाचे प्रमुख,प्रचार सभेत काय बोलतील आणि निवडणूक झाल्यानंतर काय करतील याचा नेम नाही.
खोटे आश्वासने देऊन महाराष्ट्र राज्यासह देशातील मतदारांचा,शेतकऱ्यांचा,विद्यार्थ्यांंचा,बेरोजगार युवकांचा,नागरिकांचा,महिला भगिनींचा आणि मजूरांचा गेम करणारा भाजपा हा धोकेबाज पक्ष आहे.
तद्वतच देशात भरमसाठ माहागाई वाढवून या देशातील नागरिकांचे खिसे खाली करणारा कपटी व नागरिक द्वेषी पक्ष आहे हे त्यांना जुमलेबाज घोषणावरुन शिध्द झाले आहे.
याचबरोबर मतदारांना,विद्यार्थ्यांना,शेतकऱ्यांना,महिलांना सुरक्षेची व प्रगतीची (उन्नतीची) हमी दिल्यानंतरही दिलेले शब्द न पाळणारा भाजपा सारखा कपटी व बेईमान पक्ष जगाच्या पाठीवर सापडणार नाही.
जुमलेबाज घोषणांचे सरदारच दस्तुरखुद्द प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आहेत.तर निवडणूक झाली की,”तो एक निवडणूक जुमला होता,असी बतावणी करणारे देशाचे गृहमंत्री अमित शहा आहेत.
निवडणूक प्रचारात मतदारांना शब्द देऊन तेच शब्द निवडणूक झाल्यानंतर फिरवणाऱ्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना व देशाचे गृहमंत्री अमीत शहांना काय म्हणावे?…
याचबरोबर निवडणूक काळात देशाच्या नागरिकांशी खोटे बोलणारे देशाला प्रधानमंत्री व गृहमंत्री मिळाले हे या देशाचे महार्दुदैव नाही काय?
*****
भाजपाने निवडणूक काळात दिलेली खोटी आश्वासने…
१) दरवर्षी २ करोड नौकरी देण्याचे आश्वासन…
२) शेतकऱ्यांच्या शेतीमालाला दुप्पट हमीभाव देण्याचे आश्वासन…
३) महिलांची सुरक्षा करण्याचे आश्वासन…
४) प्रत्येक नागरिकांना १५ लाख रुपये देण्याचे आश्वासन…
५) परदेशातून काळा रुपया देशात आणण्याचे आश्वासन…
६) महागाई कमी करण्याचे आश्वासन…
७) देशात १० स्मार्ट सिटी करण्याचे आश्वासन…
८) आतंकवाद व दहशतवाद कमी करुन देशातील नागरिकांना सुरक्षित ठेवण्याचे आश्वासन..
आणि इतर आश्वासने…
******
या उलट नागरिक,महिला,विद्यार्थी,शेतकरी,बेरोजगार विरोधी भाजपाची कृती…
१) धार्मिक उन्मादातंर्गत देशातील नागरिकांचे व युवकांचे भविष्य उध्वस्त करण्याची कार्यपध्दत..
२) धार्मिक-जातीय व इतर दंगलीची योग चौकशी न करणे,व योग्य गुन्हेगारांचा शोध न घेणे.
३) शेतकऱ्यांच्या शेतीमालांचे भाव नेहमी पाडणे.
४) रासायनिक खतांचे भाव ५० वरुन ७००,२०० वरुन १४००,४०० वरुन १७०० करणे..
५) २८ हजार रुपये तोळ्यावरुन ८० हजार रुपये तोळे पर्यंत सोन्याचे भाव करणे..
६) ४२ हजार रुपये किलो चांदीचे भाव १ लाख १० हजार करणे..
७) ४०० रुपये गॅस सिलिंडर ११०० रुपये करणे..
८) पोट्रोल व डिझेल चे भाव वाढवणे.
९) भांडवलदारांच्या हितासाठी तांदूळ,गहू,दाळ,खाद्य तेल,यांचे भाव वाढवणे..
१०) शिक्षण व्यवस्था महागडी करणे..
११) ओबीसी,एससी,एसटी, अल्पसंख्याक,व्हिजेंटी-एन्टी, मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या मुलांनी उच्च शिक्षण घेऊ नये म्हणून खबरदारी घेणे.
१२) शैक्षणिक व्यवस्थाचे ब्राम्हणीकरण करणे व बहुजन समाज संस्कृतीला नाकारणे..
१३) बहुजन समाजातील जगप्रसिद्ध संत महापुरुषांच्या महान कार्याला शिक्षण कार्यपद्धतीतून हटवीणे..
१४) ओबीसी,एससी,एसटी,अल्पसंख्याक,व्हिजेंटी-एन्टी,समाजाचे आरक्षण लागू न करण्याच्या षडयंत्राचे भागीदार असणे म्हणजे जातीनिहाय जनगणना न करणे,या समाजाचे अधिकार कपटनितीने नाकारणे.. भाजपाच्या केंद्र सरकारने १९९८ ला जातीनिहाय जनगणना न करण्याचा लोकसभेत ठराव मंजूर करणे..(तात्कालिन प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी.)
१५) जुनी पेन्शन योजना भाजपाच्या केंद्र सरकार द्वारे सन २००२ ला बंद करणे म्हणजे बहुजन समाजातील नागरिकांना उन्नती पासून रोखणे..(तात्कालीन प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी.)
१६) संविधान विरोधी कंत्राटी पद्धती लागू करुन भांडवलदारांचे हित साधणे व बहुजन समाजातील विद्यार्थ्यी व बेरोजगारांचे भविष्य बरबाद करणे..लोकशाही पध्दतीला नाकारुन हुकुमशाही लागू करणे आणि बहुजन समाजातील विद्यार्थ्यांचे,मजुरांचे,सर्व प्रकारच्या मजुरांचे,नौकरदार अधिकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे हक्क नाकारणे..
१७) प्राथमिक शाळा बंद करणे व सदर शाळांची जागा आणि शाळा भांडवलदारांच्या घशात टाकणे.
१८) महाराष्ट्र राज्यातील उधोग गुजरात व मध्यप्रदेशात हलविणे..
१९) राजकीय महिला आरक्ष बिल चुकीच्या पद्धतीने लोकसभेत पारित करुन एससी,एसटी,ओबीसी महिला भगिनींवर अन्याय करणे..
आणि इतर निर्णय…
*****
भाजपाने भांडवलदारांचे सर्वोतोपरी जपले हित…
देशातील नागरिकांच्या सर्व प्रकारच्या सर्वोच्च विकासासाठी काही न करणारे भाजपा सरकार भांडवलदारांसाठी देशातील तिजोऱ्या सातत्याने खाली करीत आहे.
तद्वतच जागतिक व देश पातळीवरील बँक व खाजगीदारांकडून खरबो रुपयांचे कर्ज घेतले व सडक,बंदर,विमानतळे यांचे बांधकाम झपाट्याने करुन भांडवलदारांसाठी दळणवळणाच्या सोयीसुविधा करुन दिल्यात व देत आहेत.
याचबरोबर त्यांच्या उधोगधंद्यांना फुकट पाणी देणे व विज पुरवठा करणे,याही सुविधा त्यांना बिनधास्त दिल्या जात आहेत.
तद्वतच या भांडवलदारांचे खरबो रुपयांचे कर्ज वारंवार माफ केले व परत खरबो रुपयांचे कर्ज दिले.येवढेच काय तर खरबो रुपयांचे विज बिल माफ केलेत..
भांडवलदारांच्या उन्नतीसाठी देशाची अमाफ धनसंपदा खर्ची घातले जात आहे व देशात आर्थिक विषमतेला बळ दिले जात आहे.
*****
देशाचे सामान्य नागरिक व त्यांच्यावर दरडोई भाजपाने केलेले कर्ज..
भाजपाने देशातील नागरिकांचा विकास या नावाखाली खरबो रुपयांचे देशविदेशातून कर्ज घेतले व देशातील नागरिकांवर दरडोई लाखो रुपयांचे कर्ज करुन ठेवले.
भाजपच्या केंद्र सरकारने या देशातील नागरिकांवर दरडोई म्हणजेच प्रत्येक व्यक्ती १ लाख ४४ हजार रुपये कर्ज केले असल्याचे पुढे आले आहे.
तर भाजपाच्या महाराष्ट्र सरकारने दरडोई ५७ हजार रुपयांचे कर्ज केले आहे.
मागील पार पडलेल्या विधानसभा अधिवेशनात काँग्रेस पक्षाचे आमदार व माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी नागरिकांवर केलेल्या कर्जाची आकडेवारी सादर केली होती.
आणि सभागृहात त्यांनीच सांगितले होते महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक नागरिकांवर महाराष्ट्र सरकारने ५७ हजार रुपये कर्ज केले आहे.
*****
पि.एम.किसान सन्मान योजना व पडद्याआड शेतकऱ्यांची लूट..
पिएम किसान सन्मान योजना सुरु करुन शेतकऱ्यांना वर्षामागे ६ हजार रुपये देणे सुरू केले होते.
यानंतर महाराष्ट्र राज्य सरकार मिळून १२ हजार रुपये दिले जात आहेत.आता १५ हजार रुपयांची घोषणा केली जात आहे.
मात्र,शेतकऱ्यांना १२ हजार रुपये पिएम किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून दिले जात असताना रासायनिक खतांचे गगनाला भिडणारे भाव भाजपाच्या केंद्र सरकारने वाढवीले.
याचबरोबर शेतमालावर फवारणी करणारे किटकनाशक औषधांचे भाव सुध्दा भयंकर वाढविले,यामुळे पिएम किसान सन्मान योजनेचा शेतकऱ्यांना फायदा झाला असे म्हणता येत नाही..
*****
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना व माहागाई वाढवून लागलीच लुट…
महाराष्ट्र राज्याच्या भाजपा मित्रपक्ष सरकारने आपले अपयश झाकण्यासाठी व विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी,बिना अट “मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना सुरु केली.. रुपये खात्यात जमा करणे सुरू झाले.
मात्र या योजनेमुळे महाराष्ट्र राज्याच्या तिजोरीवर भयंकर ताण पडत असल्याचे वास्तव उघड झाले ते १०० रुपयांची स्टाम्प ड्युटी ५०० रुपये केल्याने,खाद्य तेलाचे,डाळीचे,इतर मुलभूत गरजेच्या वस्तूंच्या किंमती झपाट्याने वाढविल्याने..
एका बाजूने देणे व दुसऱ्या बाजूने त्याहीपेक्षा जास्त काढणे,हे भाजपा व त्यांच्या मित्र पक्षांचे आर्थिक धोरण या देशातील सर्व सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडणारे आहे व सर्व सामान्य गोरगरीब जनतेचे,शेतकऱ्यांचे सातत्याने खिशे खाली करणारे आहे.हे या देशातील मतदारांनी वेळीच लक्षात घेतले पाहिजे आणि भाजपा पासून सावध राहिले पाहिजे..
******
विशेष व महत्वाचे…
महाराष्ट्र राज्यातील मतदारांनो भाजपा व त्यांच्या मित्र पक्षांपेक्षा आणि त्यांच्या सत्ते पेक्षा,तुमचे व तुमच्या मुलाबाळांचे भविष्य महत्वाचे आहे हे लक्षात घ्या…
तद्वतच धार्मिक व भावनिक विचारांनी भविष्य घडविले जात नाही तर शैक्षणिक,आर्थिक उन्नतीतून भविष्य घडविले जातय याची जाणीव होऊ द्या…
भाजपा व त्यांच्या मित्र पक्षांनी अनेक लोक विरोधी धोरणातंर्गत तुमचे बेहाल केले असताना आणि तुमचे मुलभूत अधिकार कंत्राटी पद्धतीने नाकारले असतांना,त्या पक्षाला जवळ करणे आणि मतदान देणे म्हणजे मतदारांचा शुद्ध मुर्खपणाच ठरेल.
म्हणूनच महाराष्ट्र राज्यात भाजपा उमेदवारांना व त्यांच्या मित्रपक्षांच्या उमेदवारांना,मतदारांनी नाकारले पाहिजे.
याचबरोबर महाराष्ट्र राज्यातील मतदारांच्या,शेतकऱ्यांच्या,विद्यार्थ्यांच्या,बेरोजगारांच्या,महिलांच्या,युवतींच्या सुरक्षेसाठी,भाजपा व त्यांच्या मित्र पक्षांच्या उमेदवारांना पराभूत केले पाहिजे.