लोकशाही केवळ निवडणुकीपुरतीच असते का?
स्वतःच्या हृदयातील सदसदविवेक बुद्धीला प्रश्न विचारा..
मगच मतदान करा….
मोदीजी तुम्ही दिला इशारा जाता जाता….
“हरियाणातील निवडणुकी पूर्वीच्या पाच वर्षात तेथील शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलने केली.शेकडो शेतकरी शहीद झाले.
भाजपच्या स्थानिक मस्तवाल नेत्यांनी विनेश फोगाट सारख्या जागतिक महिला खेळाडूचे लैंगिक शोषण केले.
राज्यात अल्पसंख्यांकावर अत्याचार केले. हरियाणाची जनता पाच वर्षात भाजपच्या सरकारला पूर्णता कंटाळून पर्यायी काँग्रेसच्या पारड्यात मत टाकणार असे एकंदरीत जमिनीवरचे चित्र निर्माण झालेले होते.विशेष म्हणजे हे वास्तव होते.
उलट मोदीने हरियाणात एकही सभा किंवा रॅली काढलेली नसताना,अमित शहा यांनी सुद्धा एक रॅली आणि सभा घेऊन काढता पाय घेतला.
परंतू…..
तरीसुद्धा,……
निवडणुकीपूर्वी 5 दिवसापूर्वी तेथील मुख्यमंत्री नायबसिंग सैनी यांनी पत्रकार परिषदेत आणि सभेत सांगितले,…..
“की,आमच्याकडे सर्व व्यवस्था आहे.आम्ही सर्व व्यवस्था करुन ठेवलेली आहे. छ्तीसगडप्रमाणेच इथेही घडेल. भिण्याचे काहीही कारण नाही. जेंव्हा 8 आक्टोबरला EVM उघडतील तेंव्हा काँग्रेस रडेल आणि म्हणेल की,EVM ने यांना जिंकून दिले. “
अगदी त्याचप्रमाणे घडले सुद्धा!
जेंव्हा पोस्टल मतमोजणी सुरुवातीला एक तास चालली त्यात तेंव्हा काँग्रेस 61 ठिकाणी आघाडीवर होती,तर भाजप 25 ठिकाणी आघाडीवर होती.
ज्यावेळी एका तासानंतर EVM मतमोजणी चालू झाली.तेंव्हा काँग्रेसची जागा भाजपने घेतली अन काँग्रेस खूप खाली येऊन शेवटपर्यंत हीच लीड राहिली……
शेवटी भाजपने बाजी मारली!
जेंव्हा निकाल लागला,भाजपच्या गोटात देशात आणि महाराष्ट्रात सुद्धा मुंबईत सुद्धा मिठाई वाटून आनंद व्यक्त करण्यात आला.तेंव्हाच मुंबईत देवेंद्र फसणवीस यांनी लगेच वक्तव्य केलं की….
“आता हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रात होईल.”
याचा अर्थ काय?
स्पष्ट आहे की इथेही आम्ही EVM ची व्यवस्था केलेली!
आज महाराष्ट्रात सुद्धा गेल्या अडीच वर्षात फोडाफोडीच्या राजकारणातून रसातळाला गेलेला असतांना,केवळ अडीच वर्षात,अडीच लाख कोटीचे कर्ज या मिंधे सरकारने सर्वसामान्य महाराष्ट्रीयन जनतेच्या डोक्यावर वाढवून ठेवलेले आहे.
लोकसभेत 21 वरून 9 वर भाजप खाली आलेली असतांना,शेवटच्या तीन महिन्यापूर्वी लाडकी बहीण व भावू योजना आणून,पैशाचा महापुर निर्माण करण्यासाठी RBI ला हाताशी धरून लाखो कोटी रुपये त्यांच्या भागभांडवलाद्वारे लुटून महाराष्ट्राच्या निवडणुकीत सर्रास वापर चालू आहे.
त्याकडे निवडणूक आयोग मूग गिळून बसले आहे.त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे पुणे येथील एका गाडीत 8 कोटी रुपये सापडले.
परंतू ,निवडणूक आयोगाने मात्र ना तपास केला,ना ही कोणत्या उमेदवाराला नोटीस पाठवली,ना ही कुणाची उमेदवारी रद्द केली.
असा महाराष्ट्रात गेल्या अडीच वर्षांपासून गचाळ राजकारणाचा नंगा नाच चालू असतांना,मतदानाच्या शेवटच्या काळातील पैशाच्या महापुराने राजकीय वातावरण मुद्दाम तापवून भाजप EVM च्या मुद्द्यावर आणून ठेवण्याचे काम करत आहे.महाराष्ट्रात योगी आदित्यनाथाची ( यू. पी. मुख्यमंत्री ) प्रचारसभा अक्षरंशा रिकाम्या खुर्च्यासमोर झाली!
त्यानंतर मोदीची रॅली आणि सभा अकोल्यात झाली तिथेही मोदी यांनी बहुतांश रिकाम्या खुर्च्यासमोर भाषण केले,ते म्हणाले..
आता हरियाणाप्रमाणेच महाराष्ट्रात होणार आहे.येथील जनता पूर्वीपेक्षाही जास्त जागा आम्हालाच निवडून देणार आहे!
हे मोदींचे वरील वक्तव्य छ्तीसगड,हरियाणा,आता महाराष्ट्राला EVM गिळून तर टाकणार नाही ना?
वरील तिघांचेही वक्तव्य हेच सुतोवाच करणारे नाहीत ना!
असे जर घडलेच……
तर महाराष्ट्राचा बिहार झाल्याशिवाय राहणार नाही.
पुढील 4 वर्षात देशातील सर्वसामान्य जनतेला या…
EVM ला कायमचे गाडण्यासाठी स्वातंत्र्ययुद्धाप्रमाणे रस्त्यावर उतरावे लागेल. जोपर्यंत EVM हटत नाही तोपर्यंत…
इथे आमच्या मताचा अधिकार EVM हटविल्याशिवाय सुरक्षित राहणार नाही.हे सिद्ध होऊन जाईल!
परंतू,तरी सुद्धा आहे त्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी मतदान करणे आवश्यक आहे, म्हणून….
मताचा अधिकार ही एक भावी आणि आजची आमची सर्वांची जबाबदारी आणि कर्तव्य समजून पार पाडावे…
*****
विनंती :- प्रत्येकांनी आजपासून 20 नोव्हेंबर पर्यंत येणाऱ्या मतदान जागृतीच्या सर्व पोस्ट दररोज आपल्या मोबाईल मधील जेवढे व्हाट्सअप गृप आणि मो. नं. असतील त्यावर अपलोड करुन व्हायरल कराव्यात….
*****
जागृतीचा लेखक आणि आवाहनकर्ता..
अनंत केरबाजी भवरे
संविधान विश्लेषक,औरंगाबाद, रेणापूरकर, 7875452689