प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज चिमूरात…

      रामदास ठुसे 

विशेष विभागीय प्रतिनिधी..

        प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भाजपा मित्रपक्षांच्या उमेदवार प्रचारार्थ आज चिमूरला येत आहेत.

      आमदार किर्तीकुमार भांगडीया यांच्या नवीन निवासस्थानाच्या मागे (चिमूर-पिंपळनेरी – भिसी मार्ग.) सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

         प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज दिनांक १२ नोव्हेंबर रोजी चिमूरात येत असल्याने पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.

         प्रधानमंत्र्यांच्या सुरक्षेसंबंधाने चंद्रपूर जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा सतर्क व सज्ज आहे.

            चिमूर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक अतिशय चुरशीची झाली असल्याने निवडणूक इतिहासात या निर्वाचन क्षेत्रात पहिल्यांदाच देशाचे प्रधानमंत्री येत आहेत.