युवराज डोंगरे
उपसंपादक
दर्यापूर अंजनगाव विधानसभा मतदार संघ हा अनुसूचित जाती करिता राखीव असून हा मतदार संघ विकासापासून कोसो दूर आहे.
ना चांगले रस्ते आहेत,ना आरोग्य सुविधा,ना पिण्याच्या पाण्याची सोय दर्यापूर येथील सूतगिरणी शकुंतला रेल्वे असे अनेक प्रश्न या प्रस्थापित नेत्यांना कधी महत्त्वाचे वाटले नाही.
स्वतःचे घर भरणे हाच यांचा एकमेव कार्यक्रम राहिलेला आहे. दहा-पाच बगलबच्चे पोसणे म्हणजे विकास नव्हे,गावागावात या प्रस्थापित नेत्यांना व उमेदवारांना जाब विचारा,ही पायघड्या घालण्याची वेळ नाही.वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष संजय चौरपगार यांनी म्हटले आहे.
त्यांचे पक्ष भ्रष्टाचाराने बरबटले आहेत. (१५००) रुपयात लाडकी बहीण योजना काडून खरेदीचा धूर्त शक्कल हाणून पाडा.पक्षाची प्रतिमा पाहून मतदान करा.
सत्तेचे रक्त तोंडाला लागलेल्या या प्रस्थापित नेत्यांना कायमचे हद्दपार करा.आता नाही तर पुन्हा कधीच नाही.अशी वेळ आली आहे.तुमच्या लेकरांचे भवितव्य उज्वल करणारी ही निवडणूक आहे.
फसव्या भूलथापांना बळी पडू नका तुम्ही ठरवलं तर अशक्य काहीच नाही. यावेळी त्यांना इंगा दाखवाच सर्वोत्तम पर्याय तुमच्या समोर आहे. दर्यापूर अंजनगाव मतदार संघाचे नंदनवन करण्यासाठी गॅस सिलेंडर चिन्हावर मतदान करा,असे आवाहन जिल्हाध्यक्ष संजय चोरपगार यांनी वंचित बहुजन आघाडीचे दर्यापूर अंजनगाव विधानसभेचे उमेदवार अंकुश साहेबराव वाकपांजर यांना बहुमताने निवडून आणा.
एससी,एसटी,ओबीसी यांचे आरक्षण वाचवा असे आवाहन संजय चौरपगार यांनी मतदार संघातील नागरिकांना केले आहे.