
ऋषी सहारे
संपादक
एटापल्ली :- तालुक्यातील गट ग्रामसभा गर्देवाडा कडून तोडगट्टा येथे विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू असून त्या आंदोलनामध्ये येऊन आंदोलकांना मार्गदर्शन करून सहकार्य करण्याची विनंती ग्रामसभा गर्देवाडा च्या पदाधिकाऱ्यांनी भारत राष्ट्र समिती चे नेते,आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या आलापल्ली येथील निवासस्थानी भेट घेऊन विनंती केले.
निवेदन देतांना गर्देवाडा ग्रामसभा अध्यक्ष रमेश महा,माजी जि.प.सदस्य चुंडू दोरपेटी,दिनेश गावडे,अडवे गोटा,सादु दोरपेटी,राजू आत्राम,वुडगा पल्लो, नवलु दोरपेटी,राजू कोडो, रामजी गोटा सह ग्रामसभेचे पदाधिकारी उपस्थित होते.