दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे
वृत्त संपादीका
प्रेसनोट जैसे थे…
रजि. नं.: म.रा. मुंबई १२९/१९८६ जो.बी.बी.एस. डी./एफ १११२८ (मुंबई)..
***
केंद्रीय कार्यलय पत्ता..
अरहन्त को.ऑप.हौ.सो.लि., ए-विंग,पहिला मजला, ब्लॉक नं. ८,चिंचपाडा रोड,काटेमानिवली,कल्याण (पूर्व) ४२१३०६….
*****
जाहीर नम्र निवेदन….
प्रिय माना जमात बंधु-भगिनिंना,
सप्रेम जय मानिका !
आपणास कल्पना आहेच कि दिनांक २० नोव्हेंबर २०२४ रोजी चिमुर विधानसभा क्षेत्रात निवडणुक घेण्यात येत आहे.
प्रस्थापित राजकीय पक्ष आपआपल्या परीनी उमेदवारांच्या प्रचारार्थ गावोगावी फिरुन जनतेचे मत परीवर्तन करण्यासाठी जोरदार प्रयत्नांना लागलेले आहेत.
समाजाचे काही नेते आपल्या स्वतःचे आर्थीक हीत संबंध जपण्यासाठी समाजास गृहीत धरुन एका पक्षातून इतर पक्षात कोलांटऊडी मारत असतात व समाज संघटनेस बाधा निर्माण करतात.अशा पुरस्कृत नेत्यांपासुन समाज बांधवांनी सावध राहावे.
तसे पाहिले तर आमचे हे मंडळ सामाजिक आहे.आजपर्यंत मंडळाने सामजिक प्रश्नावर अनेक प्रकारचे आंदोलन करुन जमातहित रक्षणाचा प्रयत्न केला आहे.
एवढेच नव्हे तर न्यायालयीन मार्गाने उच्च न्यायालयापासून तर सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा देऊन समाजाला आपले संविधानिक हक्क मिळवून देण्याचे काम तसेच शासकीय स्तरावर देखील प्रयत्नाची पराकाष्ठा करुन आपल्या हक्कावर कोणतीही गदा येवू नये यासाठी सतत जागृतपणे कार्य करीत आहे.
अशा या सामाजिक कार्यात शासकीय स्तरावरील प्रश्न सोडवण्यासाठी राजकीय नेत्यांचे सहकार्य घेणे हे अत्यंत आवश्यक बाब आहे आणि त्यासाठी आपल्या हक्काचा माणूस विधानसभेत असणे देखील अत्यंत आवश्यक आहे.
सध्यास्थितीत आपल्याकडे आरमोरी विधानसभा क्षेत्राचे एकमेव आमदार आपल्या बरोबर आहेत त्यामुळे त्यांच्या सहाय्याने आपण शासनस्तरावरील अनेक कामे करुन घेत आहोत.
आपल्या चिमुर क्षेत्रात माना जमातीची लोया जवळजवळ ६५ हजार एवढी असतांना देखील आपणाकडे या क्षेत्राचे प्रतिनिधित्व नाही हे दुर्देवच म्हणावे लागेल.
एक गोष्ट मात्र निश्चित कि ज्याचे काम त्यालाच करावे लागते.या कामात आपलाच माणूस असल्यावर हिरीरीने तो करुन घेऊ शकतो.या निवडणूकीच्या निमित्याने आता आपला माणूस विधानसभेत पाठविण्याची संधी उपलब्ध झालेली आहे.ती आपण वाया दवडता कामा नये.
म्हणनूच मंडळाने दि.०६/११/२०२४ रोजीच्या ऑनलाईन तातडीच्या सभेत चिमुर विधानसभा क्षेत्रातील तरुण तडफदार धडाडीचे उमेदवार श्री.अरविंद आत्माराम सांदेकर यांना एकमताने पाठींबा जाहीर केलेला आहे.
तेव्हा त्यांना बहुमताने आपले अमुल्य मत देवून आपल्या हक्काचा माणूस,आरक्षणाचा बचाव करण्यासाठी बुलंद वकृत्चाच्या नेतृत्वाला निवडून देवून विधानसभेत पाठविण्यासाठी आव्हान करीत आहोत.
****
अरविंद सांदेकरांचा सामाजिक कार्यात सहभाग…
१) माना आदीम जमात मंडळाच्या वतीने सन २००६ मध्ये बचत भवन नागपूर येथे झालेल्या विजय मेळाव्यात माणिका देवी मंदीर स्थापनेची संकल्पना मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसमारे मांडली व पूर्णत्वास नेण्याची सर्व समाज बांधवांना विनंती केली.
२) मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसोबत माणिका देर्वीच्या मुळ मूर्तीच्या शोध कार्यासाठी वैरागड,माणिकगड,दंतेवाडा पर्यंत प्रवास…
३) गडचिरोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर माजी मंत्री वसंत पुरके यांच्या विरोधात काढलेल्या निषेध मोर्चात सहभाग…
४) गडचिरोली येथील जेलभरो आंदोलनास सक्रीय सहभाग व अटक…
५) मंडळाच्या वतीने नागपूर येथे माननीय आमदार देवेंद्र फडणवीस व सुधीर मुनंगटीवार यांना सामाजिक प्रश्नावर निवदेन देणाऱ्या प्रतिनिधी मंडळात सहभाग…
६) सिंदेवाही तालुक्यातील कुकडहेटी,मोहाळी,समाजाच्या सामुहिक विवाह मेळाव्यात सहभाग व मदत,तसेच कढोली येथीले समाजाच्या सामुहिक विवाह मेळाव्यात सहभाग व मदत..
७) जांभुळघाट येथे मंडळाच्या वतीने झालेल्या सामुहिक विवाह सोहळ्यास सक्रीय सहभाग व मदत..
८) चंद्रपुर येथे मॉ माणिका देवी मंदीर स्थापनेसाठी मूर्ती भेट..
९) नवखळा (नागभीड) येथे मॉ माणिका देवी मंदिर स्थापनेसाठी मूर्ती भेट…
१०) मालेवाडा (चिमुर) येथे मॉ माणिका देवी मंदिर निर्मितीसाठी सहकार्य व आर्थिक मदत…
११) कोलारा (चिमुर) येथे मॉ माणिका देवी मंदिर निर्मितीसाठी सहकार्य व आर्थिक मदत..
१२) चिमुर विधानसभा क्षेत्रातील जनतेच्या विविध प्रश्नांना शासन दरबारी वाचा फोडने आणि त्यांच्या तक्रारीचे निराकरण करण्याच्या अनुषंगाने आंदोलने करुन पंचायत समिती व तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले.
१३) जात पडताळणी समिती गोंदिया येथे माना जमातीवर केलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी भव्य जन आंदोलन…
१४) अनेक समाज बांधवांना कठीण प्रसंगी सहकार्य व आर्थिक मदत…
१५) गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक मदत व जात वैधता प्रमाणपत्रासंबंधी अडचणीत आलेल्या समाजबांधवांना न्यायालयीन प्रक्रियेत सहकार्य व आर्थिक मदत.
१६) माना जमाती विरोधात भाष्य करणारे काँग्रेसचे माजी मंत्री श्री. शिवाजीराव मोघे यांच्या धिक्कार मोर्चाचे तालुकानिहाय भव्य आयोजन..