सुधाकर दुधे
सावली तालुका प्रतिनिधी
राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांची सामाजिक बांधिलकी,सर्व समाजाला न्याय देण्या हेतू सुरु असलेले अथक प्रयत्न,सामान्यांप्रती असलेली आपुलकी,सामान्य कार्यकर्त्यांची जाण व क्षेत्रात सुरू असलेल्या विकास कामांचा झंजावात अशा विविध कार्यामुळे प्रेरित होऊन सावली तालुक्यातील वाघोली (बुटी) येथील अनेक भाजप कार्यकर्त्यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
गेल्या दहा वर्षात राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रासह सावली तालुक्यात सर्व समाजाप्रती त्यांची आदर भावना,मतदारसंघात शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय,मुलभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी विवीध विकासकामे,रोजगार,शिक्षण,आरोग्य,क्रीडा अशा विविध कार्यातून त्यांनी मतदारसंघातील जनतेची मने जिंकली आहे.
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या सर्वसमावेशक सामाजिक,राजकीय व विकासात्मक दूरदृष्टीकोण तसेच सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या अपेक्षांची जाण असणारा नेता म्हणून या सामाजिक भावनांनी प्रेरित होवून सावली तालुक्यातील वाघोली (बुटी) येथील भाजपा कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
यावेळी सावली तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष नितिन गोहने यांचेसह अनेक पदाधिकाऱ्यांची उपस्थीती होती.
आयोजित प्रवेशाप्रसंगी मार्गदर्शन पर बोलतांना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की,मी सामन्यातून आलो असल्याने मला सामान्य कार्यकर्त्यांची जाण आहे.मला प्रत्येक समाजाला समान न्याय देणे,त्यांचा हक्क मिळवून देण्याची शक्ती ही तुमच्या कडूनच मिळाली आहे.तुमच्या विश्वासाला मी तडा जावू देणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी सर्व कार्यकर्त्यांच्या गळ्यात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी काॅंग्रेस पक्षाचा दुपट्टा टाकून काँग्रेस पक्षात प्रवेश स्वीकारत स्वागत केले.
यावेळी पक्षप्रवेश केलेल्यांमध्ये वाघोली (बुटी) चे गाव तंटा मुक्त समिती अध्यक्ष पुरुषोत्तम बोरकुटे, माणिक रोहनकर, ज्ञानेश्वर चुधरी, वसंत भांडेकर, किशोर भूरसे, दिपक भांडेकर, दिवाकर बोरकुटे, आनंद म्हशाखेत्री, गणपत भांडेकर, बंडू पेंदोर, गिरिधर बोरकुटे, पंकज बोरकुटे यासह असंख्य कार्यकर्त्यांचा समावेश आहे.