बाळासाहेब सुतार
निरा नरसिंहपूर प्रतिनिधी
2024 च्या इंदापूर तालुका विधान सभेचे परिवर्तन विकास आघाडीचे अपक्ष उमेदवार माजी सभापती प्रवीण भैया माने यांच्या प्रचारासाठी जनतेचा व मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सकाळी दहा वाजल्यापासून मौजे गणेशवाडी या ठिकाणी घोंगडी बैठकीला सुरुवात झाली त्यानंतर नरसिंहपुर, पिंपरी बुद्रुक, गिरवी, टणु, ओझरे, गोंदी, या गावांमध्ये घोंगडी बैठकीच्या सभा पार पडल्या सदर सभेला प्रत्येक गावातून लोकांनी उदंड असा प्रतिसाद दिल्याचे चित्र पाहायला मिळाले तसेच पिंपरी बुद्रुक येथे निखिल मगर युवा मंच यांचे सर्व पदाधिकारी यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन प्रवीण भैया माने यांना पाठिंबा दर्शवला.
पिंपरी बुद्रुक येथील पीरसाहेब बाबांच्या दर्ग्यामध्ये जाऊन बाबांच्या चरणी नतमस्तक होऊन फुलांची चादर अर्पण करण्यात आली, आशीर्वाद घेतला.
सदर या प्रचार दौऱ्यामध्ये प्रमुख उपस्थिती प्रवीण भैया माने व मयूरशिह पाटील, विजय घोगरे,नागेश गायकवाड, विजय गायकवाड उमेशरावजी घोगरे, शरद नाना चितारे ह भ प माने महाराज, बाळासाहेब कोकाटे,अभिजीत घोगरे, महेश शिरसागर नामदेव बोडके, बालाजी बोडके, दिलीप बोडके, कल्याण भंडलकर, राहुल कांबळे, अण्णासो पाटील, समाधान सरवदे,चंद्रकांत सरवदे, नागनाथ गायकवाड, ऋषिकेश सुतार, शंभुराजे चौगुले,नौशाद शेख, समाधान सुतार, नागेश लावंड, आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सर्व बावडा ते लाखेवाडी गटातील व प्रत्येक गावातील तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट
ओझरे तालुका इंदापूर येथील शहीद जवान वजीर रस्ते यांच्या स्मारकाचा देखील विकास झालेला नाही म्हणूनच मला एक वेळ आमदार होण्याची संधी द्या संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही.
तसेच तालुक्यातील युवकांना नवीन कारखानदारीची निर्मिती करून रोजगार मिळवून देऊ व गोरगरिबांच्या हाताला काम देण्यासाठी प्रयत्नशील राहील.