चेतक हत्तीमारे
जिल्हा प्रतिनिधी भंडारा
लाखनी :- ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब लाखनी तर्फे पर्यावरणस्नेही दीपावली तसेच लाखनी निसर्गमहोत्सवाचे मागील २० वर्षापासून अखंडपणे निःशुल्क आयोजन होत असून पर्यावरणाचे महत्व सांगणारे आकाशकंदिल बनवा व पणती सजावट स्पर्धांचे आयोजन नेचर पार्क लाखनी बसस्थानकावर प्रमुख अतिथिंच्या उपस्थितीत व सिध्दीविनायक हॉस्पिटल, नगरपंचायत लाखनी माझी वसुंधरा 5.0 अभियानाअंतर्गत स्वच्छ्ता व पर्यावरण विभाग , मानव सेवा मंडळ,रा.स्व.संघ भंडारा गोंदिया जिल्हा पर्यावरण विभाग शाखा , नेफडो जिल्हा शाखा भंडारा,अभा अंनिस तालुका शाखा लाखनी व जिल्हा शाखा भंडारा यांचे सहकार्याने करण्यात आले.
प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त प्राचार्य माधवराव भोयर, ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लबचे कार्यवाह तसेच लाखनी नगरपंचायतचे ब्रँड ॲम्बेसेडर प्रा. अशोक गायधने,अध्यक्ष अशोक वैद्य, पदाधिकारी अशोक नंदेश्वर यांनी फटाक्यामुळे होणारें प्रदूषण समजावून देत पर्यावरणस्नेही आकाशकंदिल व इकोफ्रेंडली पणती सजावट कसे तयार करावे याची माहिती दिली.
यावेळी ग्रीनफ्रेंड्सचे दिलीप भैसारे , योगेश वंजारी,दिलीप निर्वाण तसेच वाहतूक नियंत्रक श्यामकांत गिऱ्हेपुंजे यांनी स्पर्धकांना पर्यावरणस्नेही दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.यानंतर स्पर्धकांनी दोन तास अथक परिश्रम घेवून फटाकामुक्त संदेश देणाऱ्या आकर्षक पर्यावरणस्नेही आकाशकंदिल बनविले व पर्यावरण संदेशपर आकर्षक पणती सजावट केली.
प्रमुख अतिथी डॉ.छगन राखडे, डॉ.मनोज आगलावे,डॉ.दीपक आगलावे, डॉ ,सौ.आगलावे, सालेभाटा पोलिस पाटील बोपचे मॅडम, प्रा .अर्चना गायधने यांनी निरीक्षण केले.
या पर्यावरण संदेश आकाशकंदील बनवा स्पर्धेत प्रथम क्रमांक शुभम नंदेश्वर यास तर व्दितीय क्रमांक कृणाली बोपचे तर तृतीय क्रमांक आराध्या बोपचे व श्वेता नांदगावे यांना प्राप्त झाला.
शालेय गटातून प्रथम क्रमांक योगिनी मळकाम,रितिका कुंभरे , खुशबू कुंभरे,गायत्री वैद्य,मंथन वैद्य,मयंक वंजारी,ईशान वैद्य यांना तर व्दितीय क्रमांक चारू वैद्य ,सृष्टी वंजारी यांना प्राप्त झाला.तृतीय क्रमांक वेदांती वंजारी, काव्या वंजारी यांना प्राप्त झाला.
पर्यावरणसंदेश पणती सजावट स्पर्धेत श्रेया नंदेश्वरला प्रथम तर योगिनी मळकामला व्दितीय क्रमांक तर तृतीय क्रमांक मेघा मळकाम व चारू वैद्य हिला प्राप्त झाला. शालेय गटानुसार सृष्टी वंजारी,काव्या वंजारी व मंथन वैद्य यांना प्रथम क्रमांक तर सौम्या वैद्य याला व्दितीय तर तृतीय क्रमांक वेदांती वंजारी,मयंक वंजारी यांना प्राप्त झाला.वरील दोन्ही स्पर्धेचे परीक्षण प्रा.अर्चना गायधने तसेच सालेभाटा पोलीस पाटील मॅडम बोपचे यांनी केले.
लाखनी निसर्गोमहोत्सव, पर्यावरणस्नेही दीपोत्सवाच्या निमित्त्ताने आयोजित वरील दोन्ही उपक्रमास यशस्वी करण्याकरिता नगरसेवक संदीप भांडारकर,अशोका बिल्डकॉन पर्यवेक्षक अभियंता नितीश नागरीकर,नाना वाघाये,डॉ.प्रमोद ईमदेव देशमुख, डॉ. योगेश गिऱ्हेपुंजे, शिवालय कन्स्ट्रकशनचे अधिकारी अरुण मोरय्या व दिपेश गौतम,सामाजिक कार्यकर्ते व शासकीय कंत्राटदार रामलाल बिसेन,भूपेंद्र बाळू निर्वाण,अनिल बावनकुळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रजत अतकरे व ऋतुजा वंजारी, से.नि.नायब तहसिलदार गोपाल बोरकर, ज्येष्ठ नागरिक मारोतराव कावळे, भैय्याजी बावनकुळे, रमेश गभने, से.नि. प्राचार्य अशोक हलमारे, शिवलाल निखाडे,डॉ.दिलीप अंबादे, योगराज डोर्लिकर, मधुकर गायधनी, अथर्व गायधने, अर्णव गायधने इत्यादींनी अथक परिश्रम घेतले.