गोरवटवासीय समस्याग्रस्त,विकास पुरुषाचे लक्ष गोरवटवासियांकडे मागील १० वर्षांपासून का म्हणून गेले नाही? — डॉ.सतीश वारजुकरांकडे गोरवट ग्रामस्थांनी मांडली व्यथा..

 

     रामदास ठुसे 

विशेष विभागीय प्रतिनिधी..

       मागील दहा वर्षापासून भाजपचे आमदार बंटी भांगडीया चिमूर मतदार संघात कार्यरत आहेत.अनेक कार्यकर्त्यांची फडी त्यांच्याकडे आहे.पण,चिमूर पासून २० किलोमीटर अंतरावर असलेल्या मौजा गोरवटवासियांच्या समश्यांकडे स्वतःला विकास पुरुष म्हणणाऱ्या आमदार किर्तीकुमार भांगडीयाचे लक्ष का म्हणून गेले नाही?हा प्रश्न अत्यंत संवेदनशील आहे.

      ना.फडणवीस सारखा व्यक्तीला डोक्यात घेतले की, विदर्भातंर्गत सर्वात जास्त निधी खेचून आणणारा एकमेव आमदार बंटी भांगडीया आहे असे वक्तव्य ऐकाला मिळते आहे.

       पण,परिस्थिती या उलट दिसते आहे,विधानसभा क्षेत्रातील अनेक गावे विकासाच्या कोसो दूरवर आहेत,मौजा कोटगाव नदीवरील पुलाच्या समस्या कडे दुर्लक्ष करणारे आमदार मौजा गोरवटच्या समस्या समजून घेण्यास व निकाली काढण्यात अयशस्वी ठरले हे लपून राहिले नाही.

         येथील जनतेला मतदानावर बहिष्कार टाकण्यासाठी आमदार व चीमुरातील प्रशासन जबाबदार आहे असे म्हणावे काय?

       गेल्या दहा वर्षापासून गोरवट उमा नदीच्या पात्रातून अवैध रेती उपसा जोरात चालला आहे.गावकरी अवैध रेती भरलेले ट्रॅक्टर पकडुन देत असतात.

       मात्र,चीमुरतील स्थानिक प्रशासन कुंभकर्णी झोपेत असते.त्यांना अवैध रेती उत्खननासी काहीच देणेघेणे नाही अशा प्रकारे त्यांची वर्तनुक राहीली आहे.

      अनेक प्रश्न घेऊन गोरवट वासीय जनता (ता०४) ला प्रशासकीय भवन चिमूर येथे शेकडो नागरिकांसह उपस्थितीत होते.आवश्यक मागण्या व समस्यांचे निराकरण होणार ही अपेक्षा घेऊन चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन तहसीलदार मार्फत पाठवण्यात आले.तरीही प्रशासन गाढ झोपेत कसे काय आहे हेच कळायला मार्ग नाही.

        गावात ७०० ते ७५० लोकसंख्या असताना सुद्धा गावात अनेक वर्षापासून स्वतंत्र ग्राम पंचायत नाही.ग्रामपंचायत मागणीला गोरवटवासियांनी प्रशासन दरबारी रेटून धरले पण त्यांच्या पदरी अपयशच लागले.

        म्हणून चिमुर विधानसभा मतदारसंघातील आमदार किर्तीकुमार भांगडीया व चंद्रपूर प्रशासन यांचा विरोध म्हणून येत्या विधानसभा निवडणुकीत मौजा गोरवटवासिय बहिष्कार टाकणार आहेत.

      आमदार किर्तीकुमार भांगडीया व प्रशासन लक्ष देत नसल्याने डॉ.सतीश वारजुकरांनी आमच्या गावच्या समस्याकडे लक्ष देऊन आम्हाला न्याय मिळवून द्यावा याकरिता सर्व गावकऱ्यांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाकडे धाव घेतली व न्याय मिळवून द्या अशी मागणी केली. 

      गावकऱ्यांशी संवाद साधत डॉ.सतीश वाररजुकरांनी समस्यांचे निराकार करून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार अशी ग्वाही गावकऱ्यांना दिली.

         केवळ रस्ते बांधकामांत चिमूर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांचा अजिबात विकास नसून,त्यांच्या मुलभूत समस्यांचे निराकरण करण्यात व मुलभूत गरजा उपलब्ध करून देण्यात विकास दडलेला आहे हे आमदार किर्तीकुमार भांगडियांना केव्हा समजेल?

        नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करणारा आमदार नकोय असा सुरु मतदारातून आता सर्वत्र घुमतो आहे.