रामदास ठुसे
विशेष विभागीय प्रतिनिधी
निवडणूक कार्नर सभा अंतर्गत मौजा बोडधा येथे घडलेला घटनाक्रम अनुचित असून मतदार शंकर प्रेमकुमार रामटेके यांना मारण्याचा व जातिवाचक शिविगाळ करून सार्वजनिक ठिकाणी लज्जीत करण्याचा घटनाक्रम गंभीर आहे.
या घटनाक्रमाशी,”दारुचा किंवा दारु पिन्याचा कुठल्याही संबंध नसताना,तक्रारदार शंकर प्रेमकुमार रामटेके यांना दारु भोवती गोवण्याचा प्रयत्न अप्पर जिल्हा पोलिस अधीक्षक रिना जनबंधू,चिमूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी राकेश जाधव,भिसी पोलिस ठाण्याचे ठाणेदार चाहांदे,उपनिरीक्षक वाघ यांनी प्रथम दर्शनी केलाय व प्रकरणाला दाबण्यासाठी आणि प्रकरणाला वेगळी कलाटणी देण्यासाठी वेळ मारुन नेल्याचे पत्रकार परिषदेतील आरोपावरून दिसून येते आहे.
सार्वजनिक ठिकाणी जातिवाचक शिविगाळ करून मारहाण करणे व लज्जीत करणे हा घटनाक्रम गंभीर असताना,सदर प्रकरणाला दारुच्या भोवती फिरवून सत्ता पक्षाच्या उमेदवाराला आणि पदाधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रकारच पोलिस प्रशासनाकडून घडलेला दिसतो आहे.
तक्रारदार शंकर प्रेमकुमार रामटेके हे घटनेच्या दिवशी अजिबात दारु पिऊन नव्हते हे उपविभागीय पोलिस अधिकारी राकेश जाधव व भिसी ठाणेदार चाहांदे यांच्या लक्षात आले असल्याने त्यांनी तक्रारदाराची मेडिकल टेस्ट केली नाही,हे वास्तव आहे.
असे असताना तक्रारदार शंकर प्रेमकुमार रामटेके यांना भविष्यसाचा पाठ गिरवित व त्यांना धाक दाखवीत प्रकरणाला थांबविण्याचा प्रयत्न पोलिस अधिकाऱ्यांकडून का म्हणून घडलाय हेच सर्वातमोठे गंभीर असे कोडे आहे.
अनुसूचित जाती- जमातीच्या मतदारांवर असे मारहाण करणारे व लज्जीत करणारे प्रकरणे घडत राहावे व त्यांना मुजोर लोक असुरक्षित करीत रहावे,असे पोलिसांना वाटते काय?
तद्वतच गैर अर्जदार सरपंच प्रफुल्ल कोलते,बोडधा ग्रामपंचायत सदस्य राकेश बरधे,भाजपाचे बोडधा बुथ प्रमुख योगेश सहारे हे अजिबात दारु पित नाही असे पोलिस अधिकारी म्हणू शकतात काय?
जर एखादा व्यक्ती दारू पिऊन असेल आणि त्याचा कुणी खून केला असेल किंवा त्याला गंभीर मारहाण केली असेल,वा जातिवाचक शिविगाळ केली असेल,सार्वजनिक ठिकाणी मारहाण करून अपमानास्पद वागणूक दिली असेल तर पोलिस प्रशासनाकडून मारहाण करणे वाल्यांवर व जातीद्वेषी भुमिका वटवनेवाल्यांवर गुन्हे दाखल केले जात नाही काय?हा प्रश्नच जनमानसात गोंधळ निर्माण करणारा आहे.
मग तक्रारदार शंकर प्रेमकुमार रामटेके हे दारु पिऊन नसताना,”बोडधा येथील गंभीर घटनाक्रम दारु भोवती का म्हणून पोलिस अधिकारी घुमवतात,या संबंधातील कोडे त्यांनाच माहीत.
महाराष्ट्र राज्यातील मतदार किंवा नागरिक दारु पितात व वादविवाद करतात असे पोलिस विभागाच्या लक्षात आले असेल तर महाराष्ट्र राज्यातील सर्व प्रकारच्या मद्यांच्या दुकानांची परवाने रद्द करण्यासंबंधाने पोलिस विभागाने महाराष्ट्र शासनाच्या संबंधित मंत्रालयाला अहवाल सादर करायला पाहिजे.तोच अहवाल मुख्यमंत्र्यांना व गृहमंत्र्यांना पाठवायला पाहिजे.
घटना क्रमाचे वास्तव बाजूला ठेवून वेळ मारुन नेणे व गंभीर प्रकरणातंर्गत तक्रारदारावर दबाव टाकणे हाच सर्वात मोठा गुन्हा नाही काय? तक्रारदारांवर पोलिस दबाव टाकत असतील तर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी सभ्य नागरिक जातील काय?हे पोलिस विभागानेच ठरावावे..
***
घटनाक्रम….
चिमूर विधानसभा मतदारसंघान्वये भिसी पोलिस स्टेशन अंतर्गत मौजा बोडधा येथे भाजपाच्या वतीने विना परवानगी प्रचार कार्नर सभा घेण्यात आली होती.
या कार्नर सभेला मांगलगाव येथील सरपंच प्रफुल्ल कोलते मार्गदर्शक म्हणून होते.तर स्थानिक उपसरपंच सदाशिव घोणमोडे,भाजपा बुथ प्रमुख योगेस सहारे,ग्रामपंचायत सदस्य राकेश बरधे हे सुद्धा सभेला उपस्थित होते.
मतदार व नागरिक असलेले शंकर प्रेमकुमार रामटेके हे बोडधा गावातीलच रहिवासी असल्याने त्यांनी गावातील विकास कामाबद्दल प्रफुल्ल कोलते यांना प्रश्न केलाय.त्यांनी सदर प्रश्नाचे रितशीर आणि सरळ उत्तर देणे अपेक्षित होते.
मात्र,सरपंच प्रफुल्ल कोलते यांनी कु.शंकर प्रेमकुमार रामटेके यांच्या प्रश्नाचे उत्तर न देता त्यांना अश्लील व अपमानास्पद शब्दात बोलून प्रकरणाराला अकारण तापवन्याचा प्रकार केलाय व स्थानिक भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना भडकावित जातिवाचक शिविगाळ करीत सार्वजनिक ठिकाणी शंकर प्रेमकुमार रामटेके यांची काॅलर पकडून मानेवर मारले व सार्वजनिक ठिकाणी लज्जीत केले असल्याचे प्रकरण हव्यासारखे अख्या महाराष्ट्र राज्यात पोहोचले.
निवडणूक आचारसंहिता काळात अनुसूचित जाती-जमातीच्या मतदारांना जातिवाचक शिविगाळ करता येत नाही व सार्वजनिक ठिकाणी त्यांना लज्जित करता येत नाही.त्यांच्यावर मतदानाच्या बाबतीत दबाव टाकता येत नाही आणि त्यांची मानहानी होईल अशी कृती नेत्यांना,पदाधिकाऱ्यांना,कार्यकर्त्यांना करता येत नाही.
असे प्रकरणे अनुसूचित जाती-जमातीच्या मतदारांच्या बाबतीत घडवून आणली गेली असल्यास सदर प्रकरणे अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायदा अंतर्गत येतात.
भाजपा उमेदवार किर्तीकुमार भांगडीया यांच्या प्रचारार्थ मौजा बोडधा येथे ३ नोव्हेंबर २०२४ ला भाजपा पदाधिकाऱ्यांनी कार्नर प्रचार सभा घेतली हा पहिला गुन्हा आहे आणि या कार्नर सभा नुसार भाजपा उमेदवार किर्तीकुमार भांगडीया व इतर सर्व कार्नर सभेला उपस्थित असलेल्या मांगलगाव येथील सरपंच प्रफुल्ल कोलते यांच्यासह सर्वांवर निवडणूक आचारसंहिता नियमानुसार कारवाई करण्याची गरज आहे.
तद्वतच बोडधा घटनाक्रमाला अनुसरून संबंधितांवर उचित कारवाई केली जाणे सुध्दा तितकेच महत्त्वाचे दिसते आहे.
असे असताना सत्ताधारी पक्षाच्या उमेदवाराला व त्यांच्या पदाधिकाऱ्यांना वाचवण्याचा खटाटोप कशासाठी?