दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार दिलीप मोहीते पाटील यांच्या तिर्थक्षेत्र आळंदी देवाची येथील पदयात्रेला तुफान प्रतिसाद मिळाला. ठिकठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा स्वागतासाठी थांबलेले नागरिक, औक्षणासाठी थांबलेल्या महिला भगिनी, त्यांच्यावर होणारी पुष्पवृष्टी, फटाक्यांची आतिषबाजी, आणि सळसळत्या तरुणाईची निघालेली उर्जावान पदयात्रेच्या माध्यमातून आळंदीत महायुतीचे उमेदवार दिलीप मोहिते पाटील यांच्या विजयासाठी महायुतीने ‘वज्रमूठ’ बांधली आहे.
या पदयात्रेत महिला तसेच तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महिला भगिनींच्यावतीने मोहिते यांना औक्षण करण्यात आले. आळंदीतील सर्व नऊ प्रभागात महायुतीचे उमेदवार दिलीप मोहीते पाटील यांच्या प्रचारार्थ भव्य पदयात्रा काढण्यात आली.
यावेळी शिवसेना शहरप्रमुख राहुल चव्हाण, भाजपचे शहराध्यक्ष किरण येळवंडे, राम गावडे, माजी सभापती डि.डि.भोसले, श्रीधर कुऱ्हाडे, प्रकाश कुऱ्हाडे, संजय घुंडरे, पांडुरंग वहिले, सौरभ गव्हाणे, रोहन कुऱ्हाडे, संदेश तापकीर, आकाश जोशी, आनंद वडगावकर, राहुल थोरवे, रुपाली पानसरे, गौरी गोळे, प्रीती तापकीर यांच्यासह इतर मित्र पक्षातील आजी-माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.