चिमूर तालुक्यातील मौजा खापरी (डोमा) येथील संमिश्र पंचशील भजन मंडळ सातत्याने करतोय समाज प्रबोधनाचे कार्य…

      रामदास ठुसे 

विशेष विभागीय प्रतिनिधी… 

          चिमुर तालुक्यातील जनतेमध्ये देशभक्ती निर्माण झाली आणि चिमुर येथील जनता इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी लढा देऊ लागली.

         सन १९४२ मध्ये चिमुर क्रांती घडली आणि भारत देशात प्रथमच चिमुर स्वातंत्र झाला असल्याची घोषणा बर्लिन रेडिओ द्वारे महान स्वातंत्र्य सेनानी सुभाषचंद्र बोस यांनी केली.

       विश्वरत्न भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील महिला व दलित बहुजन समाजाच्या न्याय हक्कासाठी लढा दिला.

      त्यांनी निर्माण केलेल्या चळवळीला अनुसरून,त्यांनी स्थापन केलेल्या संघटनेला महत्व देऊन व त्यांच्या महाकार्याला स्मरुण भजन,पोवाडे,गीते यांच्या माध्यमातून वामन कर्डक व इतर लोकांनी समाज प्रबोधन केले आणि समाज जागृतीचा वसा जपण्याचे महात्तंम कर्तव्य पार पाडले.

      आज देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला आहे. परंतु देशात आजही काही जून्या रुढी परंपरा कायम आहेत.त्या रुढी परंपरा मिटविण्यासाठी समाजाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या विचारांची गरज आहे.

          तद्वतच महापुरुषांचे विचार भजना व्दारे जनमानसांपर्यंत पोहोचविण्याचे काम आजही सुरु आहे.संमिश्र पंचशील भजन मंडळ खापरी ( डोमा ), तालुका चिमुर येथील भजन मंडळ मागील १५ ते २० वर्षापासून कार्यरत असून आजपर्यंत पूर्व विदर्भात त्यांनी शेकडो कार्यक्रम घेत समाज प्रबोधन केले आहे.

      अरुण गणवीर,विलास रामटेके,धनराज शेंडे,दिलीप रामटेके,रुपचंद गणवीर,जगदीश मादांळे,हिराचंद रामटेके,अल्का गणवीर,सुप्रिया पाटील,पंचशीला रामटेके,जासूनदा रामटेके,शारदा रामटेके,अस्मिता मादांळे,माया शेंडे,कांता रामटेके,मोहना मैश्राम, सुभाष गणवीर,सुनील मोहुर्ले,अशा अठरा लोकांचा भजन मंडळ असून त्याच्या भजन मंडळाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

       संमिश्र पंचशील भजन मंडळ खापरी ( डोमा) यांच्या कार्याचे जनतेकडून कौतुक केले जात आहे.