धार्मिक सण उत्सवात पोस्टरबाजी बॅनरबाजी करणारे उमेदवार निवडणुकीत फिरले मागे… — वाजागाजा न करणारे मात्र निवडणुकीच्या रिंगणात…

युवराज डोंगरे /खल्लार 

           उपसंपादक

         यंदाच्या धार्मिक सण उत्सव समारंभाला राजकीय स्वरूप मोठ्या प्रमाणात प्राप्त झाले होते. गणपती उत्सव, दुर्गादेवी उत्सव, कावड यात्रा,ते दसऱ्यापर्यंत इच्छुक उमेदवारांनी आपला लाखो रुपये जाहिरातीवर अप्रत्यक्षरीत्या खर्च केला. यंदाच्या कावड यात्रेला संपूर्ण दर्यापुरात इच्छुकांचे बॅनर मोठ्या प्रमाणात झळकले होते.

           त्यामध्ये प्रामुख्याने महाविकास आघाडी व महायुती मधील घटक पक्ष यांच्या वतीने सुद्धा मोठ्या प्रमाणावर पोस्टरबाजी करण्यात आली.यामध्ये काँग्रेस इच्छुकांची संख्या मात्र अधिक होती. परंतु महाविकास आघाडी मधील उबाठा गटाला मतदारसंघ सुटल्यामुळे अनेक इच्छुकांच्या नाराजी नाट्याची मालिका सुरू आजपर्यंत कायम होती.

          महायुतीमध्ये भाजपच्या वतीने बंडखोरी झाली असून ते सावरणे सुद्धा सुरू आहे. महाविकास आघाडी तर्फे शिवसेना ठाकरे गटाला मतदारसंघ सुटला असून महाविकास आघाडी मधील घटक पक्ष त्यांच्या प्रचारार्थ सहभागी झाले आहेत.

           एकंदरीत बघता दर्यापूर मध्ये तिहेरी लढत होण्याची दाट शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवण्यात आली आहे. गजानन लवटे ,रमेश बुंदिले, अभिजीत अडसूळ, हे प्रतिस्पर्धी निवडणुकीच्या रिंगणात एकमेकांनपुढे उभे आहेत यंदा धार्मिक सण-उत्सवावर इच्छुकांनी केलेली पोस्टरबाजी बॅनरबाजी हे निष्फळ ठरल्या गेली.