दर्यापूर मतदार संघात 16 उमेदवारांची निवडणुकीतून माघार.. — 16 उमेदवार रिंगणात.. 

युवराज डोंगरे /खल्लार 

           उपसंपादक

     दर्यापूर विधानसभा मतदार संघात उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 16 उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेत दाखल केलेले नामांकन अर्ज मागे घेतले. तर 16 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात कायम आहेत.

माघार घेतलेले उमेदवार 

संतोष गोंडुजी कोल्हे, भिमराव विठ्ठल कुऱ्हाडे, शरद जानराव आठवले, गुणवंत सुदाम देवपारे, सिद्धार्थ पांडुरंग वानखडे, रामेश्वर महादेव अभ्यंकर, रमेश झिगुजी अंभोरे, दिलीप साहेबराव गवई, नंदीनी दयाराम थोटे, संजय हिरामन आठवले, रविंद्र किसन गवई, गोपाल रामकृष्ण चंदन, विजय यशवंत विल्हेकर, विक्रम गजानन पारडे, श्रीराम श्रावण नेहर, संजय तुलसिदास पिंजरकर,या 16 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले.

निवडणूक रिंगणात उभे असलेले उमेदवार 

कॅप्टन अभिजित आनंद अडसूळ शिवसेना (शिंदे गट)धनुष्यबाण, गजानन लवटे शिवसेना (उबाठा)मशाल, प्रा नागोरावं हंबर्डे बहुजन समाज पक्ष हत्ती, अरुण वानखडे प्रहार जनशक्ती बॅट, अंकुश वाकपांजर गॅस सिलेंडर, कैलास मोरे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए)दुरदर्शन, नाजूकराव चौरपगार पीप्लस पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटीक फळांची टोपली, रमेश बुंदीले राष्ट्रीय युवास्वाभिमान पार्टी पाना, सुमित्रा साहेबराव गायकवाड जन जनवादी पार्टी शिट्टी, तर अपक्ष उमेदवार कांचनमाला रविकिरण गावंडे,ऑटो रिक्षा, मनोहर चौथमल कात्री, रविकिरण तेलगोटे प्रेशर कुकर, ऍड राजु कलाने जहाज, निलेश राक्षसकर शिलाई मशीन, डॉ प्रा सुजाता आठवले रोड रोलर, ऍड संजय वानखडे ट्रक दर्यापूर मतदार संघाची निवडणूक चुरशीची होणार असल्याचा अंदाज राजकीय विश्लेशकांचा व्यक्त केला आहे.

माघार घेतलेल्या अपक्ष उमेदवार एक दोन दिवसात निर्णय घेणार 

          दरम्यान दर्यापूर मतदार संघात अपक्ष म्हणून ज्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यांनी एकत्र येऊन फुले शाहू आंबेडकरी मतांचे विभाजन टाळण्याकरीता एक उमेदवार निवडून आणायचा निर्णय घेतला रिंगणात कायम असलेल्या अभ्यासू, इमानदार व एकनिष्ठ उमेदवारास पाठींबा देण्याबाबत समन्वयक समिती स्थापन करण्यात आली. असून एक दोन दिवसात समन्वयक समितीची बैठक होणार असून या समन्वयक समितीच्या बैठकीत सर्वांनुमते कोणत्या उमेदवाराला पाठींबा द्यायचा यावर निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे ही समन्वयक समिती कुणाला पाठींबा देते यावर रिंगणातील उमेदवारांचे लक्ष लागले आहे.