युवराज डोंगरे
उपसंपादक/खल्लार
दर्यापूर विधानसभा मतदार संघातील निवडणुक लढविणाऱ्या बहुतेक सर्व अपक्ष उमेदवारांनी आपली एकजुट करुन सर्वांच्या वतीने एकच प्रभावी उमेदवार निवडणुकीत कायम ठेवण्याचा खळबळ जनक निर्णय घेऊन दर्यापूर विधानसभा मतदार संघाची निवडणुक ताकदीने लढण्याचे ठरविल्याने,दर्यापूर विधानसभा मतदार संघाचे सद्याचे निवडणुकीचे राजकिय चित्र बदलण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
स्थानिक नागरिक हक्क संरक्षण समितीचे अध्यक्ष,तथा जेष्ठ विधिज्ञ व भारतिय घटनेचे अभ्यासक आणि या निवडणुकीतील अपक्ष उमेदवार ऍड.संतोष कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक महालक्ष्मी सभागृहात बहुतांश अपक्ष उमेदवारांची तातडीने सभा आयोजित करण्यात येऊन त्यात हा निर्णय झाला.
त्यात सर्वानुमते अपक्ष उमेदवार ऍड.संतोष कोल्हे यांच्याकडे समन्वय समितीची जबाबदारी देण्यात आली.या घटनेमुळे दर्यापूर मतदार संघात एकच खळबळ उडाली असुन अपक्षांच्या या निर्णयाने मोठ्या मोठ्या राजकारणी धुरंधरांचे धाबे दणाणले असल्यास नवल नाही.
अपक्षाच्या भरगच्च सभेला अपक्ष उमेदवार ऍड .संतोष कोल्हे,प्रहार जनशक्ती पार्टीचे अरुण वानखडे,अपक्ष उमेदवार सिद्धार्थ वानखडे,शरद आठवले,दिलीप गवई,भिमराव कुऱ्हाडे,रिपाईचे राजेंद्र नितनवरे,ह्या शिवाय विविध पक्षाचे सम विचारी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
अपक्षांचा हा प्रयोग जर दर्यापूर विधानसभा संघातील मतदारांनी स्विकारल्यास मतदार संघातील भविष्यातील निवडणुक निकालाचे चित्र मात्र एक राजकिय चमत्कार घडविणारे ठरेल असे राजकिय निरिक्षकांना वाटत आहे.
***
बॉक्स...
दर्यापूर तालुका सरपंच संघटना अध्यक्षाची अनोखी भूमिका..
सासन रामापूरचे सरपंच तथा दर्यापूर तालुका सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रा.विनोद सोनोने हे तालुक्यातील सरपंच,उपसरपंच,ग्रा.पं.सदस्य यांचे विविध प्रश्न सोडवित असतात.या निवडणुकीत तालुक्यातील सरपंच,उपसरपंच,ग्रा.पं.सदस्य यांच्याशी चर्चा करुन आपले मत कुणाला द्यावे यावर निर्णय घेतल्या जाणार आहे.
जो उमेदवार किंवा पक्ष सरपंच,उपसरपंच,ग्रा.पं.सदस्य वाढीव मानधन,तसेच सरपंच पेंशन विषयी विधानसभेत आवाज उचलेल तसेच गावपातळीवरील विविध समस्या सोडविणाऱ्या सक्षम उमेदवारालाच मदत करुन पाठींबा दिल्या जाईल.