लोकशाही केवळ निवडणुकीपुरतीच नसते……
तर ती आमच्या व येणाऱ्या पिढीच्या कायम सर्वांगीण उन्नतीसाठीची प्रक्रिया असते.
लोकांच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणणारी,परंतू रक्ताचा एकही थेंब न सांडता अशी शाही म्हणजे लोकशाही..
महामानाव अब्राहम लिंकन नंतर लोकशाहीची गहन व्याख्या करणारे एकमेव महासुर्य म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जे आमच्या देशाला लाभले.
वरील व्याख्येनुसार आमच्या भारतीय लोकशाहीची अवस्था आज 2024 च्या काळात आपण तपासून पाहूया.
लोकांच्या ( भारतीय नागरिकांचा समूह म्हणजे समाज आणि या समूहातील अल्पसंख्यांकासहीत प्रत्येक शेवटच्या नागरिकाच्या ) सामाजिक जीवनात आमुलाग्र बदल झाला..?
या प्रश्नाचे उत्तर नाही…..!
कारण,दीड वर्षांपासून मणिपूर राज्यातील आदिवासी समाज जळत असून आमचे मोदी अजूनही तिथे भेट द्यायला तयार नाहीत.
बदलापूरसारखी प्रकरणे अजूनही पुरोगामी महाराष्ट्रात घडतात.विशेष म्हणजे हे प्रकरण दडपण्यासाठी सर्व कूटनिती व्यवस्था पणाला लावून आग विझवण्याचा प्रयत्न सरकार करते,जनता रस्त्यावर उतरून सुद्धा व्यवस्था त्यालाही जुमानत नाही!
म्हणजे आम्हाला सामाजिक न्यायापासून आम्ही आजही वंचित आहोत.
आमच्या आर्थिक जीवनातील बदलाचा विचार केला असता हे लक्षात येते की, केंद्र व राज्य सरकारांच्या अनैतिक आणि भ्रष्टाचारासाठीच्या धोरणामुळे, आमच्यावर महागाई,बेरोजगारी आणि कर्जबाजारीपणामुळे जगाच्या पोशिंद्यावर आलेली आत्महत्येची वेळ.
म्हणजे,आर्थिक समानता प्रस्थापित झाली नाही हे सिद्ध झाले.
म्हणजे,सामाजिक आणि आर्थिक लोकशाही प्रस्थापित झालीच नाही.शिवाय या व अशा परिस्थितीत सुद्धा जगण्याची धडपड करण्यासाठी आम्हाला रक्ताचे पाट दररोज वाहावे लागत आहेत!
म्हणजे लोकशाहीच्या वरील व्याख्येनुसार आमचा देश गेल्या 75 वर्षात त्या व्याख्येच्या आसपास सुद्धा पोहचू शकला नाही!
याला जबाबदार कोण?
याला जबाबदार केवळ “मी ” च आहे……!
कारण संविधान हे कोण्या राजकीय पक्षासाठी,नेत्यासाठी, विशिष्ट जातीसाठी,विशिष्ट धर्मासाठी,केवळ श्रीमंतांसाठी,केवळ पुरुषांसाठी नसून……..
हे संविधान आम्ही भारताचे लोक यांच्यासाठी आहे. आणि स्वतःप्रत अधिनियमित करुन अंगीकृत करण्यासाठी आहे….
तेंव्हा ही जबाबदारी माझीच आहे आणि मीच याला जबाबदार आहे.म्हणूनच मला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मला गुप्त मतदानाचा अधिकार जो माझ्या जिवापेक्षाही मोलाचा आहे.तो मला प्रदान केलेला आहे…..
तेंव्हा हा मताचा अधिकार मी जबाबदारीने माझ्या देशासाठी, माझ्या लोकशाहीसाठी, माझ्या संविधानासाठी, एवढेच नव्हे तर येणाऱ्या माझ्याच भावी पिढीच्या कायम उन्नतीसाठी पार पाडीन. (हा निर्णय प्रत्येकाने घ्यावा) …..
मताचा अधिकार ही एक भावी आणि आजची आमची सर्वांची जबाबदारी आणि कर्तव्य समजून पार पाडावे…..
*****
विनंती :- प्रत्येकांनी आजपासून 20 नोव्हेंबर पर्यंत येणाऱ्या मतदान जागृतीच्या सर्व पोस्ट दररोज आपल्या मोबाईल मधील जेवढे व्हाट्सअप गृप आणि मो.नं.असतील त्यावर अपलोड करुन व्हायरल कराव्यात….
*****
जागृतीचा लेखक आणि आवाहनकर्ता
अनंत केरबाजी भवरे
संविधान विश्लेषक,औरंगाबाद,रेणापूरकर, 7875452689..