महाराष्ट्रियन मतदारांनो २० नोव्हेंबरला मतदान करताना हे लक्षात ठेवा…

 

     लोकशाही केवळ निवडणुकीपुरतीच असते का…?

         स्वतःच्या हृदयातील सदसदविवेक बुद्धीला प्रश्न विचारा……

      मगच मतदान करा…. 

         तुम्ही ज्या उमेदवाराला मतदान करणार आहात, तो उमेदवार पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक लढतोय का?

       असा जर आपण विचार केला तर नवीन लोकांना संधी मिळेल…

         ज्याला तुम्ही मतदान करणार आहात ती जर महिला असेल आणि पहिल्यांदा निवडणूक लढवत असेल तर उत्तमच,कारण महिलांचे प्रतिनिधित्व आवश्यक आहे….

         ज्याला तुम्ही मतदान करणार आहात त्या व्यक्तीने यापूर्वी विधानमंडळात कधी आमदार म्हणून गेला होता का? असेल तर त्याने त्याच्या काळात तुमच्यासाठी किंवा तुमच्या मतदार संघातील सार्वजनिक समस्या सोडविल्यात का…? त्याने कधी विधानमंडळात महाराष्ट्राच्या आर्थिक कर्ज सोडविण्याचे उपाय सांगितलेत का…? त्याने पक्ष बदलून स्वार्थासाठी किंवा भ्रष्टाचारातून कमविलेली संपत्ती वाचविण्यासाठी इतर नितिभ्रष्ट पक्षात प्रवेश केलेला आहे का?

     त्याच्या आजवरच्या आचरणाच्या अनुभवातून तो तुम्हाला राज्य व देश हितासाठी गरजेचा वाटतो आहे का?

     केवळ इतर लोकं त्याच्यामागे आहेत म्हणून आपणही जावे ही परंपरागत भूमिका आता फेकून द्या…

        पाच वर्षातून मिळालेली दुर्मिळ संधी आणि आपल्या प्राणापेक्षाही मोलाचा असलेला हा मताचा अधिकार मातीमोल करू नका… 

            या देशात कुणी कुणाला मतदान करावे हे सांगण्याचा अधिकार कुणालाच नाही!

         परंतू लोकशाही,देश आणि संविधानाचे रक्षण करण्याची जबाबदारी आमची ( भारतीय जनतेची ) आहे. परंतू , गेल्या 75 वर्षात आम्ही या नितिभ्रष्ट राजकीय पक्ष आणि सनदी नोकरशाहीने आम्हाला संविधानाची ओळख करुन कधी दिलीच नाही किंवा होऊ दिली नाही.म्हणून आता याच संविधानातील मताचा अधिकार किती मोलाचा आहे,हे समजून घेण्यासाठीच कशा उमेदवाराला मतदान करावे.हे समजून घेत आहोत….

        जो उमेदवार किंवा पक्ष मला किंवा आमच्या पक्षाला मतदान करा असे आवाहन करेन,त्याला तर मतदान करूच नका..

         जो उमेदवार किंवा पक्ष म्हणेल की तुम्ही सारसार विचार करूनच मतदान कुणालाही करा. त्या पंगतीत आम्हीही बसलोय आम्हाला वाढण्याचा अधिकार तुम्हाला आहे.

       असं म्हणणाऱ्या उमेदवाराला मतदान करा मग तो भले अपक्ष असला तरी हरकत नाही…

        लाडकी बहीण योजना जर अडीच वर्षांपूर्वी कोणतेही कर्ज न काढता,किंवा ताबडतोब महागाई न वाढवता किंवा इतर योजनाना कात्री न लावता राबवली असती,तर आम्ही लाडक्या भावाचा विचार थोडाफार केलाही असता.

          परंतू वरील कुठल्याही नैतिकतेत ही योजना बसूच शकत नाही.म्हणून आमच्या भगिनी आणि मातानी या आमिषाला बळी पडू नये…

      मताचा अधिकार ही एक भावी आणि आजची आमची सर्वांची जबाबदारी आणि कर्तव्य समजून पार पाडावे.

*****

विनंती :- प्रत्येकांनी आजपासून 20 नोव्हेंबर पर्यंत येणाऱ्या मतदान जागृतीच्या सर्व पोस्ट दररोज आपल्या मोबाईल मधील जेवढे व्हाट्सअप गृप आणि मो. नं.असतील त्यावर अपलोड करुन व्हायरल कराव्यात….

****

  जागृतीचा लेखक आणि आवाहनकर्ता

            अनंत केरबाजी भवरे

संविधान विश्लेषक,औरंगाबाद, रेणापूरकर,7875452689…