दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे
वृत्त संपादीका
चिमूर तालुक्यातील ग्रामपंचायत रोजगार सेवक व आप्रेटर यांची बैठक ३१ आक्टोंबर २०२४ ला आमदार किर्तीकुमार भांगडीया यांच्या वाड्यावर घेण्यात आली.दस्तुरखुद्द आमदार किर्तीकुमार भांगडीया सभेला संबोधित करतानाचे फोटो बाहेर पडले आहेत.
बैठकीचा मुद्दा कोणता होता हे महत्वाचे नाही.मात्र निवडणूक आचारसंहिता काळात आमदारांना कोणत्याही अस्थाई कर्मचाऱ्यांची बैठक आपल्या घरी लावता येत नाही.
एकदा आचारसंहिता लागू झाली की कुठल्याही सभेची परवानगी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कडून घ्यावी लागते.आणि आचारसंहिता काळात ग्रामपंचायतीच्या अस्थाई कर्मचाऱ्यांनी आमदारांच्या घरी बैठकीला का म्हणून जावे?हा गंभीर विषय आहे.
ग्रामपंचायत रोजगार सेवक व आप्रेटर यांची आमदार किर्तीकुमार भांगडीया यांच्या वाड्यावर आचारसंहिता काळात घेण्यात आलेल्या सभेची गंभीर दखल चिमूर विधानसभा निवडणुक अधिकारी किशोर घाडगे यांनी घेणे आवश्यक आहे व सदर सभेची गोपनीय चौकशी करणेही त्यांचे कर्तव्य आहे.