प्रदीप रामटेके मुख्य संपादक
चिमूर विधानसभा मतदारसंघातील आमदार किर्तीकुमार भांगडीया यांना पराभवाची खात्रीपूर्वक भिती असल्याने त्यांनी सहज जमणारे,”जुने ते सोने,राजकीय जुगाड आपल्या सोयीसाठी जमवीले आहे.
पण,त्या जुगाडातील व्यक्तींचा प्रभाव मतदारांवर राहिलेला नसल्याने त्यांची क्षमता व विचार सुध्दा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत उपयोगात येणार नाही असे स्पष्ट चित्र आहे.
निवडणूका आल्या की आपल्या सोयीनुसार,आपल्या फायद्यासाठी राजकीय लोक इकडून तिकडे कोलांट उड्यां मारतात किंवा राजकीय लोक आपला फायदा करून घेण्यासाठी कोलांट उड्या मारायला लावतात.हा प्रकारच राजकीय क्षेत्रातील बाजार झाला आहे.
वारंवार इकडून तिकडे जाणारे माजी राज्यमंत्री डॉ.रमेशकुमार गजबे हे ब्राह्मणवादी,मनुवादी विचारसरणीचे आहेत की पुरोगामी विचारसरणीचे बहुजनवादी,समाजवादी आहेत हेच कळायला मार्ग नाही.
याचबरोबर ते आदिम आदिवासीवादी विचारधारेसी निगडित आहेत काय? यावरही आता विचार करण्याची वेळ आली आहे..
डॉ.रमेशकुमार गजबे यांची भाजपात जाणारी भूमिका व विचार त्यांच्या पध्दतीने खरोखरच योग्य आहेत काय?यावर मी विधानसभा निवडणूक झाल्यानंतर नागरिकांच्या पुढे आणणारच आहे!..
परंतु इमानदार,कणखर,स्पष्ट भूमिका घेणाऱ्या आणि नागिरिकांच्या संरक्षणासाठी सदैव संघर्ष करणाऱ्या अँड.बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांच्या,”वंचित बहुजन आघाडी या पक्षातंर्गत,पुर्व विदर्भ समन्वयक पदाचा राजीनामा देण्यामागचे कारण वाचले तर विशेष असे काही वाटले नाही.उलट त्यांनी स्पष्टपणे राजीनामा पत्रात अनेक प्रकारची स्वतःची कमजोरी विशद् केली आणि उनिवा बाहेर पाडल्यात.
डॉ.रमेशकुमार गजबे यांनी पुर्व विदर्भात वंचित बहुजन आघाडीची ताकद मागील साडेपाच वर्षाच्या कार्यकाळात वाढविली नाही आणि त्यांनी स्वतः कबूल केले मला बहुजन संघटन जमले नाही.
मात्र,जातीचे राजकारण त्यांना याआधी जमलेले.आता तेही विस्कळीत झाले आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे विधानसभा निवडणूक प्रचारातंर्गत ९ नोव्हेंबरला चिमूरला येत आहेत.या त्यांच्या प्रचारात,”आधीप्रमाणेच अकारणची गरमागरम हवा व वारेमाप बळबळ असणार,हे लपून नाही.
महाराष्ट्र राज्यातील उधोग गुजारात आणि मध्यप्रदेशात हलविणारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व त्यांच्या भाजपाने आधिच महाराष्ट्र राज्यातील युवकांना बेरोजगार करून ठेवले आहे तर दुसरीकडे महाराष्ट्राची आर्थिक स्थिती डबघाईस आणून ठेवली आहे आणि महाराष्ट्र राज्याचे वाटोळे केले आहे…यामुळे महाराष्ट्र राज्यातील जनता,त्यांचे “इकडून ऐकून तिकडे सोडून देईल,हेही सत्य आहे.
याचबरोबर याच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व त्यांच्या मित्र पक्षांनी भारतात कंत्राटदार कार्यपद्धत लागू करुन केवळ भांडवलदारांचे भले केले व नवयुवकांच्या आणि बेरोजगारांच्या हातात विना रोजगाराचे कटोरे दिले व वनवन भटकायला लावले.अशांचे काय ऐकाचे व मानायचे?
रोजगारा ऐवजी फुकटचे दरमहा पाच किलो धान्य देऊन व पिएम किसान योजनेच्या सहा + सहा हजार रुपये देऊन या देशातील नागरिकांचे अधिकारच भाजपा व त्यांचे मित्रपक्ष गुंडाळून बसले आहेत आणि अख्खा बहुजन समाजातील नागरिकांचा सत्यानाश केला आहे.निवडणूक काळात विरोधकांना खालच्या स्तरावर बोलणे हाच यांचा सर्वोत्तम गोरखधंदा झाला आहे.
अशांना जनतेचे जनसेवक म्हणायचे काय?हा प्रश्न गहनच आहे.
डॉ.सतीश वारजूकरांनी कधी नव्हे एवढी चिमूर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक चुरशीची केली आहे.डाॅ.सतीश वारजूकरांनी सत्ता पक्षाच्या आमदारांना,चौतर्फा घाम फोडला असल्यामुळे त्यांनी स्वतःला वाचवण्यासाठी दिल्ली पर्यंत धाव घेतली.
पण,दिल्लीची धाव सुध्दा त्यांना आमदार बनवणार नसल्याने आमदार किर्तीकुमार भांगडीया पुढे मोठे आव्हान असणार आहे.
जनतेच्या व मतदारांच्या अधिकार व हक्कासाठी संघर्ष करणारा आणि लढणारा व्यक्तीच चिमूर विधानसभेचे नेतृत्व करेल हे चिमूर विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी आधिच ठरवले आहे.
यामुळे आमदार किर्तीकुमार भांगडीयांना पुन्हा आमदार बनविण्यासाठी दस्तुरखुद्द प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सुध्दा यशस्वी ठरणार नाही हे मतदारांनी आता डोक्यात घेतले आहे.