दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे
वृत्त संपादीका
चंद्रपुर:- भिसी पोलिस स्टेशन अंतर्गत हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व पोलीस कर्मचारी गस्त घालत असताना मौजा शंकरपूर येथील शेतशिवारात जुगार खेळत असल्याची माहिती मुखबिरने दिली.
मुखबिरने दिलेल्या माहितीनुसार गुन्हे शाखेचे अधिकारी व पोलीस कर्मचारी घटनास्थळवर पोहोचले व ५२ पत्ताचा जुगार खेळणेवाल्यां जुगारांना ताब्यात घेतले.
श्री.अखील गुलाबराव मुनघाटे वय ३९ वर्ष,राहणार हिरापूर,ता.चिमूर यांच्यासह इतर ६ व्यक्तींवर भिसी पोलिस स्टेशन येथे अपराध क्रमांक २०१/२०२४,कलम १२ (अ),म.जु.का.अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
घटना स्थळावरुन जुगारातील रक्कम नगदी ४१ हजार ५०० रुपये व ५ मोटार सायकल आणि ईतर साहित्य किमंत ३ लाख ३६ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आला.
सदरची कारवाई ए.पी.आय.बलराम झाडोकार यांच्या मार्गदर्शनाखाली पि.एस.आय.दिपक काक्रेडवार,मधुकर सामलवार,पो.ह.संतोष निभोरकर,किशोर वैरागडे,रजनीकांत पुठावार,ना.पो.अ.संतोष येलपूलवार,पो.आ.गोपाल आतकुलवार,स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांनी केली.
सदर ठिकाणी जुगार अड्डा बऱ्याच दिवसांपासून सुरु असून अनेक जिल्ह्यातील जुगारी मालदार जुगार खेळायला येत होते असी दबक्या आवाजात जनमानसात चर्चा सुरु आहे.
जुगार अड्याचे सुत्रधार शंकरपूर,आंबोली,हिरापूर येथील असल्याची शक्यता आहे.