वंचित बहुजन आघाडी कुणाला गरम करणार?..

प्रदीप रामटेके 

  मुख्य संपादक

           अभ्यासू वृत्तीचे पदाधिकारी व कार्यकर्ते असल्याने,”वंचित बहुजन आघाडीचा दबदबा, महाराष्ट्र राज्यातील राजकारणात व समाजकारणात आहे..

            मागील विधानसभेला व लोकसभेला वंचितचे उमेदवार निवडून आले नसले तरी त्यांचे आत्मविश्वासाचे राजकीय व सामाजिक बल झुकणारे नाही व वाकणारे नाही हे प्रामुख्याने निदर्शनास आले.

       आता महाराष्ट्र राज्यातंर्ग विधानसभेची निवडणूक वंचित बहुजन आघाडी,”स्वतःच्या बळावर लढवितो आहे.वंचितांच्या उमेदवारांना मतदार साथ देतात की नाही हे निवडणूक झाल्यानंतर कळेलच!..

          पण,या पक्षाच्या विचारात जे ताकद आहे ते सातत्याने नागरिकांना प्रेरणा देणारी व त्यांचे संरक्षण करणारी आहे.

          यापक्षात लपवाछपवीचा खेळ नाही.बिनधास्त व खुलेआम समोरासमोर येवून महाराष्ट्र राज्यातील लोकांचे रक्षण करणारी त्यांची वैचारिक कार्यपद्धत आहे.

           वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अँड.प्रकाश आंबेडकरांनी महाराष्ट्र राज्यातील विधानसभा मतदारसंघातंर्ग त्यांच्या उमेदवारांना विजयी बळ देत कामाला लावले आहे.

          वंचितची बऱ्याच मतदार संघात ताकद असल्याने ते महाविकास आघाडीच्या व महायुतीच्या उमेदवारांना चांगलेच तापवणार आहेत.

        तद्वतच महाविकास आघाडीच्या व महायुतीच्या उमेदवारांना २३ नोव्हेंबरलाच, वंचितचे उमेदवार थंड करतील व शांत बसवतील एवढी शक्ती त्यांच्यात आहेच.

        महाराष्ट्र राज्यातील मतदार सुज्ञ व जाणकार आहेत काय? हे २३ नोव्हेंबरला पुढे येईलच..

        मात्र,अँड.प्रकाश आंबेडकरांना अपेक्षित असलेले कार्य,पक्ष पदाधिकारी बऱ्याच भागात करीत नसल्याचे वास्तव सुध्दा समोर आहे.

          यामुळे वंचितचे सक्रिय व इमानदार कार्यकर्ते शांत बसले असून त्यांच्या संघर्षातील पक्षाचे खरे बळ पक्ष पदाधिकाऱ्यांना ओळखता येत नसल्याची खदखद आहेच..

         असे असले तरी महाराष्ट्र राज्यातील काही भागात वंचितची ताकद ही विजयी आहे आणि पराभूत करणारी आहे,हे खरे आहे.

        वंचितांच्या उमेदवारांना मिळालेली मते ही लोकशाहीचे व मतदारांचे रक्षण करण्यासाठी असल्याने,त्यांनी वंचितच्या उमेदवारांना सर्वसाधारण न समजता रक्षणकर्ते समजने गरजेचे आहे.

           विधानसभा निवडणुकीत आपला दम दाखवीन्यासाठी वंचितांच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी नेटाने प्रयत्न केले तरच वंचितला अपेक्षित यश मिळेल.

          तापवणे व नरम होणे हे महात्मा ज्योतिबा फुले,छत्रपती शाहू महाराज,विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा भाग नव्हता तर निरंतर काळात चळवळीच्या माध्यमातून यशस्वी होणे आणि समाज नागरिकांचे,देशातील नागरिकांचे सदैव रक्षण करणे,त्यांचे हक्क व अधिकार त्यांना मिळवून देणे हे होते,हे वंचितांच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी लक्षात घेतलेच पाहिजे.