प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
अरविंद सांदेकर हे वंचित बहुजन आघाडीचे पुर्व विदर्भ समन्वयक सदस्य आहेत आणि त्यांना वंचित तर्फे चिमूर विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी जाहीर झाली आहे.
मात्र ते डॉ.रमेशकुमार गजबे यांचे खंदे समर्थक व अगदी जवळचे विश्वासू असल्याने अरविंद सांदेकर हे आता वंचित बहुजन आघाडीत स्थिरावणार की तेही वंचित मधून बाहेर पडणार हा प्रश्न जनमानसात चर्चीला जात आहे.
अरविंद सांदेकर यांनी आपल्या अनेक भाषणातून अँड.प्रकाश आंबेडकरांच्या वंचितला कधीच सोडणार नाही असे वक्तव्य केले होते.
पण,त्यांचे राजकीय व सामाजिक गुरु असलेले डॉ.रमेशकुमार गजबे यांनी वंचितची साथ सोडल्याने अरविंद सांदेकर सुध्दा वंचितला सोडणार काय? या संबंधाने पक्षाच्या गोठात असंमजस स्थिती निर्माण झाली आहे.
डॉ.रमेशकुमार गजबे हे अरविंद सांदेकरांचे राजकीय व सामाजिक गुरुच नाही तर घरगुती सदस्य सुध्दा आहेत.त्यांचे आणि डॉ.रमेशकुमार गजबे याचे अंतःकरणातून असलेले सखोल संबंध ते जपणारच आहेत यात दुमत नाही.
राजकीय,सामाजिक यातंर्गत संबंध व घरगुती संबंध यात फरक असतोय हे कुणालाही समजतय.
यामुळे अरविंद सांदेकर यांचे मन आता वंचित मध्ये स्थिरावणार की तेही बाहेर पडणार हे काही दिवसात स्पष्ट होईलच!