महादुला व चिचोली येथे शेतकऱ्यांची सभा संपन्न…

 

     कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशिवनी..

पारशिवनी:- पारशिवनी तालुक्यातील तालुका कृषी विभागा तर्फे आज मौजा महादुला व चिंचोली येथे संयुक्त पणे अन्न आणि पोषण सुरक्षा व्यापारी पिके कापूस व आंतरपीक तुर/मुग पिक प्रत्यक्षिक शेतकऱ्यांची शेतकरी सभा घेण्यात आली.

         सभेच्या अध्यक्षस्थानी चिंचोली व महादुला गावचे पोलिस पाटील श्री.सुरज सदानंद निस्ताने होते.

       शेतकऱ्यांना पिवळा/निंबा चिकट,सापळे,फिरोमन सापळ्यांचा वापर,कापूस व तुर पिकावरील एकात्मिक किंड व रोग व्यवस्थापन,गुलाबी बोंडअळीचे एकात्मिक व्यवस्थापन,शेतकरी सन्मान निधी योजना- ई-केवायसी व आधार सेंडिग यादीचे वाचन करण्यात आले.

        कृषि विभागाच्या योजना व रब्बी हंगामातील हरभरा व गहू बिज प्रक्रिया या बदल सविस्तर मार्गदर्शन केले.तसेच Bio – 45 गहू प्रकल्पासाठी शेतकऱ्यांची निवड करण्यात आली व वाणा बदल तालुका कृषी अधिकारी राकेश वासु,मंडल अधिकारी सुरज शेंडे,कृषी साहाय्यक अविनाश ढोले यांनी शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.

     सभेला मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते..