जनसेवेच्या माध्यमातुन अपक्ष निवडणूक लढणार :- नारायण जांभूळे…

 

     रामदास ठुसे

विशेष विभागीय प्रतिनिधी 

चिमूर :- ऍडव्होकेट नारायण जांभूळे यांनी राका (शरद पवार ) प्रदेश चिटणीस पदाचा राजीनामा देऊन चिमूर किंवा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रातुन अपक्ष निवडणूक लढणार असल्याचे चिमुर येथील सदभावना हॉटेल येथे आयोजीत पत्रकार परिषदेत माहिती दिली.

         यावेळी धनशक्ती विरुद्ध आपण जनशक्ती लढणार असल्याचे सांगीतले. मुल्कराज नारायण जांभूळे यांनी सुद्धा नामांकन फॉर्म घेतलेला असून, शोषीत, पिढीत, आर्थीक उन्नतीसाठी सर्वसामान्य नागरीकांच्या जनतेला वाचा फोडन्यासाठी व बहुजन समाज हितासाठी आपण चिमूर विधानसभा क्षेत्रातील उमेदवारी लढणार असल्याचे सांगितले. तसेच ऍडव्हकेट मुल्कराज नारायण जांभूळे हे सुद्धा चिमूर विधानसभा क्षेत्राचतील रणागणात उतरणार असल्याची माहिती घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.