मोहफुलाच्या हातभट्टीवर पोलीसांची धाड,आरोपींला अटक.. — ३५ हजार २४० रूपयाचा माल जप्त…

    कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशिवनी 

पारशिवनी :- पारशिवनी येथील स्टाफ पोस्टे परिसरात प्रोव्हिशन रेडकामी फिरत असताना मुखबिर कडुन विश्वसनिय खबर मिळाली कि,पारशिवनी हद्दीतील मौजा नवेगाव खैरी शिवारातील पेंच धरणाचे खाली कोराडी कॅनल कडून नदी कडे येणाऱ्या नाल्याचे काठावर एक इसम मोहाफुल हातभट्टीची दारु गाळत आहे. 

        अशा खबरे वरुन मौजा नवेगाव खैरी शिवारातील पेंच धरणाचे खाली कोराडी कॅनल कडून नदी कडे येणाऱ्या नाल्याचे काठावर मोहाफुल गावठी दारू गाळणाऱ्या इसमांवर धाड टाकली व त्याचेवय कार्यवाही केली,मुद्दे माल जप्त केलाय.

       अवैधरित्या मोहाफुल गावठी दारु काढणारा आरोपी नामे- अजय जयराम कुंभरे वय २४ वर्ष रा. बनेरा ता. पारशिवनी हा दगड विटांचे चुलीवर लोखंडी ड्रम ठेवुन हातभट्टी लावुन मोहाफुल गावठी दारू गाळतांना दिसुन आला. 

       आरोपीचे ताब्यातून..१) काळया रंगाचे एका रबरी खूब मध्ये ३० लिटर मोहाफुल दारू, १००/- रु प्रति लिटर प्रमाणे कि. ३,०००/- रु चा माल..

      २) भट्टी वरील दोन्ही ड्रमच्या बाजूला असलेल्या पांढऱ्या रंगाचे प्लास्टिक कॅन मध्ये ४० लिटर गरम मोहाफुल दारू,१००/- रु प्रति लिटर प्रमाणे किं. ४,०००/- रु चा माल…

         ३) जमिनीतील खड्ड्यामध्ये प्लास्टिक पॉलिथीन अंथरुण त्यामध्ये भिजत घातलेला ६.०० लिटर मोहाफुल सडवा, ३५/- रु प्रति लिटर प्रमाणे एकूण २१,०००/-रुपये..

          ४) हातभट्टीच्या चुलीवर ठेवलेल्या दोन्हीं लोखंडी ड्रममधील एकून १०० लिटर मोहाफुल सडवा ३५/- रु प्रति लिटर प्रमाणे एकूण ३,५००/- रुपये.‌..

        ५) दोन लोखंडी ड्रम कि.१,०००/- रु..

        ६) दोन जर्मन धामेले कि. २,०००/- रू. ७) दोन टीनाचे पिपे प्रत्येकी ५०/- रु प्रमाणे एकूण १००/- रु ८) मोहाफुल दारू गाळण्याची एक जर्मनची चाळणी किं. १००/- रू….

      ९) दोन सुती नेवार पट्टी किं. ४०/- रु..‌.

        १०) अंदाजे एक मन जळाऊ लाकूड कि. ४००/- रुपये..

        ११) दोन काळ्या रंगाची प्लास्टिक नळी एकून किं. १००/- रु…

       १२) हाथ भट्टी वरील चुलीचे विटा असा एकूण ३५२४०/- रु चा मुद्देमाल मिळून आल्याने मौक्यावर पंचनामा कार्यवाही करून नष्ट करण्यात आला. 

         आरोपी विरुद्ध पो.स्टे. पारशिवनी येथे तक्रारदार सहा फौ.देवानंद उकेबेन्द्रें तर्फे अप.क्र. ३९५/२४ अन्वये कलम ६५ (एफ), (ई), (सी) महाराष्ट्र दारुबंदी अधिनीयम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

        सदरची कार्यवाही ही श्री. हर्ष पोद्दार पोलीस अधिक्षक नागपुर (ग्रा.), श्री.रमेश धुमाळ अपर पोलीस अधिक्षक नागपुर (ग्रा),उपविभागीय पोलीस अधिकारी रामटेक विभाग रामटेक श्री.रमेश बरकते यांचे मार्गदर्शनाखाली पोस्टे पारशिवनी येथील ठाणेदार पोनि राजेशकुमार थोरात व ङि बी पथनाचे पो 34 नि शिवाजी भताने,मुदस्सर जमाल,राकेश बंधाते,संदिप बेलेकर,विरेन्दसिंह चौधरी,पृथ्वीराज चौहान इतर स्टाफ यांनी पार पाडली.