खालील पैकीं कोणता शब्द बरोबर आहे?
१)मूळ +वासी = मूळ निवासी (Native)
२)मूळ+निवासी=मुळ निवासी (Inhabitant)= मूळ रहिवासी
३)आदी+वासी=आदिवासी (Aboriginal)
४)जन +जाती=जनजाती (Tribes)
५)वन+वासी=वनवासी (Wild)
६)सिंधू+वंश=सिंधुवंश (Indigenous)
***
१)मूळनिवासी (Native) :-
मूळवासी दोन शब्दांनि मिळून बनला आहे. मूळ+वासी मूळ चा अर्थ होतो स्थान (Place) वासी चा अर्थ होतो राहणारा असे लोकं जे सुरवातीपासून तिथे वास्तव्य करून होते व जे ना कुठून आले ना कुठे वास्तव्यास कायमचे गेले.
उदाहरणार्थ :- अमेरिकेचे रेड इंडियन अमेरिकेचे मूळ निवासी (Native) आहेत. जे ना अमेरिका सोडून कुठं गेले ना अमेरिकेत दुसरीकडून आले.
***
२)मूळ निवासी (Inhabitants) ..
मूळनिवासी दोन शब्दांनी मिळून बनला आहे.मूळ चा अर्थ होतो स्थान (Place) आणी निवासी चा अर्थ होतो एखाद्या ठिकाणी येऊन राहणारा
उदाहरणार्थ :- जर आम्ही अमेरिकेत जॉब करण्या साठी गेलो आणी पाच दहा वर्षे तिथे जॉब केला आणि तिथले ग्रीन कार्ड प्राप्त केले. याचा अर्थ तिथली नागरिकता प्राप्त केली तर आम्ही अमेरिकेचे मूळ निवासी बनू शकतो परंतु मूळवासी नाही. कारण तिथले अमेरिकेतील मूळवासी तर रेड इंडियन आहेत!
मूळनिवासी(Inhabitant)चा संबंध शरणार्थी (Immigrant) आणी नागरिक (Citizen) असा होतो.
***
३)आदिवासी(Aboriginal).
आदिवासी शब्द दोन शब्द मिळून बनला आदी चा अर्थ होतो सर्वात आधी आणी वासी चा अर्थ त्या परिसरात राहणारा अश्या तऱ्हेने आदिवासी चा अर्थ त्या परिसरात आधी पासून म्हणजे सुरवाती पासून राहणारे लोक
उदाहरणार्थ:- कोण्या शरणार्थी देश्यात परिसरा (Immigrants country) त राहणारा ,वास करणारा त्यानंतर त्या देशात किंवा परिसरात दुसरे लोकं येऊन राहू लागले. असा मानव समूह वर्तमान काळात भारतातील सर्वात आधी निवास करणारे आदिवासी जे सर्वात आधी पासून या देश्यात राहू लागले व वास करू लागले. अश्यांना आदिवासी (Aboriginal) म्हणतात.
***
४)जनजाती (Tribes) …
जनजाती दोन शब्दा पासून बनला आहे. जन म्हणजे लोकं (People) जाती म्हणजे जात (Caste) अर्थात मनुष्याची वर्णवर्गा द्वारे ओळख .
मनुष्याच्या (लोकांच्या) जातीला अर्थात मानव जातीला तीन स्तरावर विभाजित केले गेले.-
१) उच्च
२)मध्य
३)निम्न
जनजाती (Tribe’s) मध्ये हे निश्चित नाही केले गेले की ही मानव जाती निम्न आहे, किंवा मध्य आहे या उच्च. यात केवळ असे सांगितले गेले की ही लोकांची जाती आहे, जनावरांची नाही. अर्थात ही जनावरे नाहीत.
***
५) वनवासी ( Wild )…
वनवासी दोन दोन शब्द मिळून बनला आहे,वन + वासी वन म्हणजे जंगल आणि वासी चा अर्थ कोण्या स्थानावर वास करणारा वनवासी चा अर्थ होतो वनात वास करणारा जंगलात वास करणारे जंगली जनावरे (प्राणी) असतात मनुष्य ,मानव नाही.कारण मानव,मनुष्य कबीले,गांव,कसब्यात ,शहरात राहतात वनात, जंगलात नाही. वनात सिह,वाघ, चित्ते, अस्वल, हरीण इत्यादी ही जनावरे, प्राणी वनात(जंगलात) राहतात.परन्तु मनुष्य शहरात आणि गावात मानव समाजात आपले जीवन व्यतीत करतात.
***
६)सिंधू वंश (Indigenous)…
सिंधूवंश दोन शब्द मिळून बनला आहे. सिंधू + वंश
सिंधू ,(Indus + वंश Genous ) = Indusgenoud सिंधू नदीला इंग्रजीत Indus म्हणतात आणी वंश याला इंग्रजीत Genous म्हणतात, आणि हे दोन शब्द मिळून Indigenous शब्दाची उत्पत्ती झाली.
कारण ब्रिटिश शब्दकोशा आधी लॅटिन शब्द कोष निर्माण झाला होता.आणी लॅटिन शब्द कोश्यात सिंधू नदी च्या किनाऱ्यावर विकसित होणारी सर्वात प्राचीन आणि विकसित सिंधू घाटी ची सभ्यता च्या लोकांना Indusgenous संबोधल्या गेले.
आणी याच आधारावर ब्रिटिश इंग्रजी च्या शब्द कोष्यात सिंधू वंशाला Indigenous सं बोधल्या गेले.
लॅटीन भाषेचा शब्द…
Indigenous वरून india शब्दाची उत्पत्ती झाली आहे.त्याचा अर्थ असा होतो की देशज अर्थात सिंधू वंशाच्या लोकांची राहण्याची जागा किंवा अश्या (सिंधू नदीच्या किनाऱ्यावर) राहणाऱ्या लोकांना मानव जातीला Indian संबोधल्या गेले.
***
संयुक्त राष्ट्रसंघ (UNO) ने ९ ऑगस्ट १९९४ ला …
International Day Of The World Indigenous peoples ची सुरवात केली.
जेणेकरून जगातील प्राचीन सिंधू घाटीच्या सभ्यतेच्या त्या लोकांना आणी त्यांच्या पारंपारिक संस्कृतीचे सौरक्षण व पोषण केल्या जाऊ शकेल.
सिंधू घाटीची सभ्यता जगातील सर्वात प्राचीन (जुनी) आणी विकसित सभ्यता राहलेली आहे.म्हणून सिंधू घाटी सभ्यतेतील लोकं सर्वात आधी हजारो वर्षांपासून जगाच्या प्रत्येक भु भागात पोचले होते.
भारतावर आर्यांनी आक्रमण करण्या आधीच.जेव्हा जगाला सात महाद्वीपात विभागले सुद्धा नव्हते म्हणून सिंधू घाटी सभ्यतेचे लोकं धर्तीच्या कोपऱ्या कोपऱ्यात सापडतात.
ज्यांच्या जीन्स (अनुवंशिकता वाहक) चे परीक्षण खूप आधीच झालेले आहे. म्हणूनच जगातील सिंधू संस्कृतीच्या लोकांना Indigenous संबोधल्या जाते.
काही डोक्यावर पडलेले लोक प्रगत सभ्य सिंधू संस्कृतीलाच हिंदू संस्कृती समजतात!
मिलिंद वानखडे
रिटा,शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया,मुंबई…
दि. २६/१०/२०२४ शनिवार