आमचा आमदार,आमचा स्वाभिमान!”आमदार असा असावा…

 मिलींद वानखडे 

       मुंबई 

           आमदार हा त्यांच्या मतदार संघाचा प्रतिनिधी म्हणून काम करत असतो.वयाची 25 वर्षे पूर्ण करणे..व तो भारतीय असणे ह्याच काय दोन अटी लागू आहेत…….

            पण आमदार म्हणजेच आपला प्रतिनिधी कसा असावा……

     1) आपल्या मतदार संघाची जाण असणारा असावा.

      2) आपल्या मतदार संघातील सामाजिक सलोखा निर्माण करून..मानवतेची प्रगती साधणारा असावा.

       3) तो सर्व समाजाचे प्रतिनिधित्व करीत असतो… त्यामुळे तो…सर्व प्रकारच्या व्यसनापासून दूर असावा.समाजाचा तो आरसा असावा.

   4) सूडबुद्धीने व आकस बुध्दीने वागणारा नसावा.

  5) शासकीय शाळेत अखंडित वीजपुरवठा मिळावा यासाठी प्रयत्न करणारा असावी.

    6) पाच वर्षे समाजसेवक म्हणून लोकांच्या सुखदुःखाची जाण असणारा व लोकांमध्ये सहभागी होणारा असावा.

     7) भेदभाव न करणारा असावा.

   8) पाणी,विज,रस्ते, शिक्षण, आरोग्य व सुरक्षितता यांची इत्यंभूत माहिती असणारा असावा.

    9) गावं तिथे शाळा,गाव तिथे ग्रंथालय व व्यायामशाळा निर्माण करणारा असावा.

     10) वृक्षारोपण करण्याची आवड असणारा असावा.

    11) टक्केवारीच्या सुत्रांकडून… सत्तेच्या सुत्राकडे मार्गक्रमण करणारा नसावा.

      12) मतदार संघातील चांगल्याच लोकांच्या संपर्कात राहून विकासाची भुमिका घेणारा असावा.

        13) भक्कमपणे मानवतेच्या पाठीशी खंबीरपणे उभा असणारा असावा.

         14) विकासकांना खो घालणारा नसावा.

        15) किमान ५ कि.मी.धावता येणारा असावा.म्हणजे स्वतः विनाआधारावर धावणारा व पळणारा असावा.

        16) भ्रष्टाचार व शिष्टाचार काय असतो..याचा थांगपत्ता लागत असणारा असावा.

      17) फोटो सेशन सोडून बाकी वेळी गरीबांच्या झोपडीतील भाकरी गळ्यातून खाली घालवून पणवणारा असावा.

      18) जात व धर्माच्या पलीकडे जाऊन मानवतेचा पूजक असावा.

      19) लोकांच्या अडिअडचणीच्या काळात लोकांना आधार देणारा असावा.

      20) विकासाची ऊर्जा अंगात बांधलेली असावी.

     21) बेरोजगार युवकांना मार्गदर्शन करून शाश्वत रोजगार उपलब्ध करून देणारा असावा….

22) छक्के पंचे करून विकासाची माती करून स्वतःच्या तिजोरी भरणारा नसावा.

     23) आपल्या मतदार संघाच्या प्राकृतिक रचनेचा अभ्यास असणारा असावा.

    24) मतदार संघातील दहशत, गुंडगिरी मोडीत काढून लोकांना गुण्यागोविंदाने राहणं राहण्यासाठी नेहमी प्रयत्न करणारा.

  25) लोकांचे प्रश्न घेऊन रस्त्यावरील लढाई बरोबर विधानसभेत… ताकदीने प्रश्न मांडणारा असावा.

    26) ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका व महानगरपालिका व राज्य शासनाची विविध कार्यालये यांच्या कामकाजावर बारीक नजर असणारा असावा.तिथे मला काय मिळेल… म्हणून हापालेला नसावा.

    27) राजकीय संन्यास घेऊन पण गुंडांना सोबत मिरवत बसणारा नसावा.

     28) माझा मतदारसंघ,समृद्ध मतदार संघ म्हणण्याची चाढाओढ लागणारा सत्ताधारी व विरोधी असावा.

     29) एखादा मुलभूत प्रश्न आलाच तर देशातील 543 + 245 खासदार आणि 4120 आमदार यांनी एकत्र येऊन… स्वतः चे आधी देश प्रेम दाखवावे.ज्या पध्दतीने पक्षांचे तिकीट मिळाले म्हणून पक्ष निधी म्हणून काही..खोकी देता..त्या पद्धतीने पहिले देश प्रेमी म्हणून देशासाठी किमान एक लाख रुपये वर्गणी दिली तर…. गोरगरीब लोकांना मोफत घरकुल योजना देऊ शकाल….पण येवढी आमदार व खासदारांमध्ये दानत हवी.