दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : खेड तालुक्यातील केळगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी सुधीर बबनराव वहीले यांची बिनविरोध निवड झाली आहे. केळगाव ग्रामपंचायतीचे मावळत्या उपसरपंच पार्वती म्हस्के यांनी त्यांच्या पदाचा ठरविलेला कार्यकाल पूर्ण झाल्याने राजीनामा दिला होता.
त्यामुळे रिक्त झालेल्या उपसरपंच पदाच्या निवडीसाठी विशेष सभा बोलावण्यात आली होती. शूक्रवार (दि.२५) ग्रामपंचायत कार्यालय केळगाव येथे रिक्त उपसरपंच पदासाठी विशेष सभा बोलावून निवड प्रक्रिया राबविण्यात आली. यावेळी सभा अध्यक्षस्थानी सरपंच गुंफाबाई ठाकर या होत्या.
यावेळी विहित मुदतेत उपसरपंच पदासाठी सुधीर बबनराव वहीले यांचा एकमेव अर्ज आला. त्यामुळे त्यांची उपसरपंच म्हणून निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. यावेळी निवडणूक सहाय्यक म्हणून ग्रामसेवक नीना रासकर यांनी काम पाहिले.
यावेळी मावळत्या उपसरपंच पार्वती म्हस्के, सदस्य लता वीरकर, किरण मुंगसे, अक्षय मुंगसे, दत्तात्रय मुंगसे, ज्योती वहीले, रुपाली मुंगसे, अश्विनी गायकवाड, नामदेव मुंगसे व पोलीस पाटील युवराज वहीले आदी उपस्थित होते.
सुधीर वहीले यांना निवडीनंतर उपस्थितांनी शुभेच्छा देत त्यांचा सत्कार केला. तसेच वहीले यांच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करत भंडाऱ्याची उधळण केली.‘गावासाठी विविध योजना व विकासकामे तसेच गावच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार,’ अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित उपसरपंच पार्वती म्हस्के यांनी दिली.