जेव्हा काही मोफत मिळत असते. तेव्हा समजून जायचं आपल्याला याची भारी किंमत मोजावी लागेल.
नोबल विजेता डेसमण्ड टूटू एकदा म्हणाला होता की,”जेव्हा मीशनरी आफ्रिकेत आले,तेव्हा त्यांच्या कडे बायबल होती आणि आमच्या कडे जमीन.
ते म्हणाले आम्ही तुमच्या सुखासाठी ईश्वरा कडे प्रार्थना करायला आलो.’प्रार्थना करण्यासाठी आम्ही डोळे बंद केले….आणि जेव्हा आम्ही डोळे उघडले तेव्हा आमच्या हातात बायबल होते,आणि त्यांच्या कडे आमची जमीन.
याच प्रमाणे जेव्हा भारतात सोशल नेटवर्क साईट्स आली.तर त्यांच्याकडे फेसबुक आणि व्हॉट्सअप होते.आणि आमच्या कडे लेखन,भाषण,आणि अभीव्यक्ती स्वातंत्र होते.
त्यांनी सांगितले हे मोफत आहे.आम्ही डोळे बंद केले आणि जेव्हा उघडले तेव्हा आमच्याकडे फेसबुक आणि व्हॉट्सअप आहे व त्यांच्याकडे आमची स्वतंत्र आणि संपूर्ण व्यक्तिगत माहिती आहे.
जेव्हा ही कोणती मोफत गोष्ट असते ती स्वीकारली तर त्याची किंमत आम्हाला आमचे स्वतंत्र देऊन मोजावी लागते.
ज्ञानानेच शब्द कळतात,आणि अनुभवाने अर्थ…
मिलिंद वानखडे
(रिटा,शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, मुंबई)
25/10/2024