बिचारे कार्यकर्ते….

मीलिंद वानखेडे 

     मुंबई 

               महाराष्ट्राच्या प्रगतीच्या व विकासाच्या दृष्टीने,आम्ही कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे पक्ष बदल करीत आहेत…

     आज विकास हा लाचार होऊन जगत आहे.नेता ऊठ सुठ पक्ष बदलतो… 

    कार्यकर्ता आमचा नेता,आमचा झेंडा म्हणून ससे होलपट करून घेतो.कार्यकर्ता म्हणून नेहमीच त्याला फक्त दांडा मिळतो.कार्यकर्त्यांचा नेहमीच समाजात जगताना वांदा होतो.नेता मात्र हंड्यावर टपून असतो.

           कार्यकर्ता बिचारा नेत्यांसाठी जिवाचे रान करून झिजतो.पण नेता मात्र पैश्यासाठी पाझरतो….

     आज कार्यकर्त्यांची अवस्था ना अलिकडचा,ना पलिकडचा झाली आहे…नेहमी तो अडकित्यात अडकतो…

व स्वतःच्या खांडोळ्या करून घेतो.

       नेता मात्र अखंड सुपाऱ्या घेत फिरतो… कार्यकर्ता मात्र अडकित्त्यातील सुपारी होऊन जातो. 

        कार्यकर्ता म्हणजे युज & थ्रो,होऊन जातो.नेता मात्र ब्रो ब्रो करून इकडून तिकडून कोलांट्या उड्या मारतो.गरज भासली तर कार्यकर्ता आठवतो.नाही तर त्याची जागा नेहमीच उकिरड्यावर राहते.कार्यकर्ता म्हणजे गाढव?…

नेता म्हणजे….? 

  कार्यकर्ता कोणता झेंडा हाती घेऊ म्हणून स्वप्नात तो धाय मोकलून रडतो…

     नेता मात्र स्वप्न पूर्ण करण्यासाठी गेंड्याची कातडी पांघरूण…मोसम बघून कोशिंबीरचा आस्वाद घेतो.

        नेत्याची भाषा खोक्यात…कार्यकर्ता असतो रिकाम्या डोक्यात…रिकामे डोके नेहमी सैतानाचे घर असते…म्हणून तो सैताना सारखा वावरत असतो.

    तूम आगे बढो ..हम तुम्हारे साथ है । कार्यकर्ता म्हणून विशिष्ट भागावर नेहमी लाथ बसते…

     नेता नेहमी खोक्याची बात असते…कार्यकर्ता म्हणून जगावं कि मरावं….अशी कार्यकर्त्यांची अवस्था झाली आहे. नेता मात्र मरणाच्या भितीने..जगण्याची सांध शोधत आहे.

         तुम्हीच बघा… कार्यकर्ता म्हणून जगण्यापेक्षा काय करतोय हे ओळखले पाहिजे…कार्यकर्ता म्हणून जगाल तर,आपल्या गोधडीतून दुसऱ्याची ठिगळे मोजण्याची वेळ स्वतःवर येणार नाही याचीही दक्षता घेतली पाहिजे.

       कार्यकर्ता यातंर्गत अजातशत्रू म्हणून जगाल तर जगण्याचे खरे सूत्र तुमच्या हाती असतील.खात्रीशीर सूत्र आपणच असू…