रामदास ठुसे
विशेष विभागीय प्रतिनिधी..
चिमूर :-
राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून,दिनांक २२ ऑक्टोंबर २०२४ पासुन उमेदवारीचे नामांकन दाखल करणे सूरु झाले आहे.
चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडिया हे दि. २४ ऑक्टोंबर २०२४ ला सकाळी १० वाजताच्या दरम्यान नेहरू विद्यालय चिमूर येथून भव्य रॅलीच्या माध्यमातून आपला उमेदवारी अर्ज उपविभागीय अधिकारी तथा निवडणुक निर्णय अधिकारी किशोर गाडगे यांच्याकडे दाखल करणार आहेत.
यामुळे चिमूर विधानसभा क्षेत्रातील समस्त जनतेनी,शेतकरी, शेतमजुरांनी उपस्थित राहावे असे आवाहन भाजपा,राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट,रिपाई आठवले गटच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने कऱण्यात आले आहे.