स्थानिक कलाकारांनी केला एक शाम किशोर के नाम सदाबहार गीताचा कार्यक्रम,नये दिलो की नयी उमंग ग्रुप द्वारा प्रस्तुत…   

 

 युवराज डोंगरे /खल्लार 

         उपसंपादक

           प्रत्येक क्षेत्रात अनेकांना काही गुण मुळातच अवगत असतात पण त्या गुणांना समाजामध्ये सार्वजनिक ठिकाणी संधी मिळत नसल्यामुळे ते गुण तसेच राहतात. अशा स्थानिक कलाकारांना एक सुंदर संधी सादर करण्यासाठीच दर्यापुरातील नये दिलो की नही उमंग ग्रुप दर्यापूरग्रुप यांनी व दर्यापूर कलाकार संघ यांच्या सहकार्याने सुनेरी यादे किशोर कुमार के नाम माहेश्वरी भवन सभागृह येथे एक शाम किशोर दा के नाम सदाबहार गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

             सर्वप्रथम माता सरस्वती व किशोर कुमार यांच्या प्रतिमेचे पूजन तथा पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. तीन वर्षा अगोदर एक सहज कल्पना शेतकरी तथा कलाकार गजानन कोरडे यांनी स्थानिक कलाकारांना संधी देण्याकरिता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

              त्यांना कलाकारांचा चांगला प्रतिसाद मिळाला मग हा कार्यक्रम ते दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणी घ्यायला लागले त्याचं उदाहरण म्हणजे यावर्षी माहेश्वरी भवन सभागृह येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

           दर्यापुरातील नवोदित जुने असे 20 कलाकार यांनी आपापले गीतांचा नजराणा सादर केला व त्यांना एक चांगला प्रतिसाद सुद्धा मिळाला एक शाम किशोरदा के नाम च्या नावावर प्रत्येकाने गीत सादर केलं.

          त्यामध्ये प्रामुख्याने आनंद नगरकर गजानन कोरडे, डी आर जामनिक, राजेश श्रीराव, श्याम देशपांडे, कळू, डॉक्टर दिनेश महाला, डॉक्टर मिलिंद बोंडे, चंद्रशेखर माहोरे, संत, सौ तिडके, सो प्रतिभाताई पोटे, शरद सहगल, गजानन सरदार, श्रीकृष्ण सोमवंशी, किशोर नगरकर, पियुष उपासने, व इतर संगीत कलाकार सहभागी झाले होते.

            कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा परिषद शिक्षक डी आर जामनिक यांनी केले. कार्यक्रमाला श्रोत्यांनी उपस्थित राहून चांगला प्रतिसाद दिला या कार्यक्रम दरम्यान अमरावती येथील सुप्रसिद्ध गायिका सौ. सुचिता खुळे, मोरे सर, तांबट यांनी सुद्धा उपस्थित राहून कार्यक्रमांमध्ये सहभाग नोंदवला.