“देशाच्या स्वातंत्र्यापूर्वीपासून ते आजपर्यंत महाराष्ट्र नेहमीच देशाला सर्वांगीण सुधारणावादाची दिशा देत आलेला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज, म.फुले,छत्रपती शाहू महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांसारखे इत्यादी देशाच्या जडणघडणीचे दिग्गज होते. म्हणूनच की काय महाराष्ट्राची राजधानी मुंबई ही केवळ राज्याचीच नव्हे तर देशाची आर्थिक राजधानी होऊ शकली.
आजही 2024 च्या काळात महाराष्ट्रावर एक मोठी जबाबदारी येऊन ठेपलेली आहे. देशात सगळीकडे संविधानविरोधी शक्ती प्रबळ होत असतांना महाराष्ट्राने त्या RSS वादी शक्तीच्या वारूची घोडदौड लोकसभा निवडणुकीत येनकेन प्रकारे रोखून धरली होती.
आता मात्र निर्णायक तशीच किंवा त्यापेक्षाही मोठी जबाबदारी पुन्हा एकदा 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणूकीच्या माध्यमातून महाराष्ट्रियन मतदारावर येऊन ठेपलेली आहे.
कारण RSS चा हा घणाघाती शेवटचा घाव ठरणारा आहे.कदाचित 2029 च्या निवडणुका होतील की नाही,हेही सांगता येणार नाही.
कारण गेल्या काही वर्षात घडलेल्या घटनाच हा संशय बुद्धीजीवी वर्गाला निर्माण करुन देतात.त्यातील त्या घटना म्हणजे गोध्रा हत्याकांड घडवून आणणारा देशाच्या प्रधानमंत्री पदी तिसऱ्यांदा विराजमान होतो,त्याचा जोडीदार सोराबुद्दीन एनकाउंटरचा मुख्य सूत्रधार,तडीपार हा देशाचा गृहमंत्री 10 वर्षासाठी बनतो.
या काळात देशाच्या लोकशाहीच्या सर्व संस्थावर,( लोकसभा अध्यक्ष,राष्ट्रपती,उपराष्ट्रपती,सर्वोच्च न्यायालय,मुख्य निवडणूक आयोग,देशाचा महानियंत्रक,देशाचा महा न्यायवादी,CBI, NI,केंद्र सरकार,इतर राज्यातील सरकारे,राज्यपाल इत्यादी सर्व प्रमुख जबाबदार संस्था ) आपल्या सोईची माणसे बसवून प्रमुख विरोधी राजकीय इतर पक्षांना संपवण्याचे, काम त्याचबरोबर जनतेचा मतदानाचा मूलभूत हक्क EVM + VVPAT च्या बळावर निवडणूक आयोगामार्फत हिरावून घेणे.या सर्व घटना म्हणजे RSS ने मोदी – शहाकडून घडवून आणलेले षडयंत्र होय.
2014 च्या लोकसभा निवडणुकीवेळी मोदींनी दिलेली आश्वासने म्हणजे “अच्छे दिन ” हे काँग्रेसने चोरलेल्या स्विस बँकेतील पैसा भारतात परत आणून प्रत्येक कुटुंबाच्या खात्यावर 15 लाख रुपये टाकू…
2024 च्या लोकसभा निवडणुकीत 15 ऑगस्ट 2022 पर्यंत प्रत्येकाला स्लॅबची पक्की घरे बांधून देण्याचे आश्वासन…
(अनेक खोटी आश्वासने आहेत,इथे प्रामुख्याने दोनच दिलेली आहेत ) हे देऊन त्याची पूर्तता केली नाही,आणि न सांगता करुन दाखवलेली कामे म्हणजे,2016 ची विनाकारण केलेली नोटबंदी,विनाकारण केलेली सेंट्रल व्हिस्टाची निर्मिती,जिच्या उदघाटनाला राष्ट्रपतीला न बोलावणे,कोरोनाच्या काळात,महामारीच्या नावावर RBI च्या राखीव निधीतून पाऊणेदोन लाख कोटी रुपये जबरदस्तीने घेणे आणि त्याचा कॅग ला हिशोब न देता त्याची विल्हेवाट लावणे,महाराष्ट्रात भगतसिंग कोश्यारीला आदेश देऊन घटनात्मक सरकार पाडून,असंविधानिक सरकारची निर्मिती करुन त्यांच्यामार्फत महाराष्ट्रातील लोकशाही संपविण्यांचे प्रयत्न केले. त्यापूर्वी पहाटेचा शपथविधी हा सुद्धा त्याचाच एक भाग होता.
असे कितीतरी संविधानविरोधी कारनामे या जोडगोळीचे या देशात चालू असतांना तिसऱ्यांदा हे बहुमताने केंद्रात सरकार स्थापन करू शकतात.!
हरियाणा निवडणुकीपूर्वी तेथील मुख्यमंत्री यांनी केलेले वक्तव्य,प्रत्यक्षात EVM वरील मतमोजणीत सत्यात उतरते.
ते केवळ आणि केवळ RSS च्या रिमोट कंट्रोल मुळेच शक्य होऊ शकते!
तेंव्हा सुज्ञ महाराष्ट्रीयन मतदाराने जागृत राहून येत्या 20 नोव्हेंबर रोजी, देशाला दिशा देण्याचा आपला चालत आलेला होकायंत्र पुन्हा गतिमान करावे….
जागृतीचा लेखक
अनंत केरबाजी भवरे
संविधान विश्लेषक,औरंगाबाद, रेणापूरकर,7875452689..