गडचिरोली पदाधिकाऱ्यांची विधानसभा निवडणूकीसंदर्भात खासदार भाई चंद्रशेखर आझाद रावण यांचेशी चर्चा… — गडचिरोली पदाधिकाऱ्यांचा संघर्ष कायम राहिल्यास सत्ता परिवर्तन निश्चित :- भाई चंद्रशेखर आझाद… — 23 ला आझाद समाज पार्टी आरमोरी विधानसभेचा उमेदवार होणार जाहीर…

ऋषी सहारे 

संपादक

धुळे – दि. 21/10/2023

          खासदार भाई चंद्रशेखर आझाद रावण हे निवडणुकीच्या पार्श्भूमीवर महाराष्ट्रातील पहिल्या सभेकरीता आले असताना गडचिरोली जिल्ह्याचे प्रमुख पदाधिकारी यांची चर्चात्मक बैठक संपन्न झाली. जिल्ह्यात घडत असलेल्या घडामोडीचीं प्रशंसा करत जिल्ह्यातील टीम नें असाच समाजासाठी संघर्ष अविरत चालू ठेवल्यास सत्ता परिवर्तन कुणीही रोखू शकत नाही असे प्रतिपादन भाई आझाद यानी केले.

 

            यावेळी जिल्हा प्रभारी धर्मानंद मेश्राम, जिल्हा कार्याध्यक्ष विनोद मडावी व जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांनी जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती व आसपा ची राजकीय भूमिका मांडली. गडचिरोली मधील तीन विधानसभेपैकी आरमोरी व गडचिरोली विधानसभेत पक्षाचे काम दखलपात्र असून दोन पैकी एक तरी सीट आपण लढवावी असा प्रस्ताव भाई चंद्रशेखर यांच्यापुढे ठेवण्यात आला. त्यावर प्रदेशाध्यक्ष आनंद लोंढे, प्रभारी अविनाश शांती व ऍड. सुमित साबळे यांचेशी मंथन करून पुढील भूमिका ठरविण्यासंदर्भात निर्देश दिले.  

          दरम्यान जिल्ह्यात शेकाप आणि आझाद समाज पार्टी युतीवर चर्चा करून आरमोरी विधानसभा लढण्याचे निश्चित करण्यात आले. सध्या पक्षाकडे विनोद मडावी, बाळकृष्ण शेडमाके, जगदीश कन्नाके, चेतन काटेंगे हे नाव पक्षाकडून चर्चेत असून प्रस्थावित इच्छुक उमेदवारांशी सुद्धा चर्चा झाली असल्याचे स्पष्ट केले. 23 ऑक्टोबर रोजी इच्छुक असलेल्या उमेदवारांना बोलवून उमेदवार अंतिम करण्यात येणार असल्याचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांनी सांगितले. इच्छुकांना आरमोरी विधानसभेचे अध्यक्ष ऋषी सहारे यांचेशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले. शेतकरी कामगार पक्षाची साथ मिळाल्याने ही लढत चूरशीची ठरणार आहे.

          बैठकीला जिल्ह्यातून पक्षाचे जिल्हा संघटक हंसराज उराडे, जिल्हा सचिव प्रकाश बन्सोड, आरमोरी विधानसभा अध्यक्ष ऋषीभाऊ सहारे, गडचिरोली विधानसभा प्रभारी धनराज दामले, मिडीया प्रभारी सतीश दुर्गमवार उपस्थित होते.