महाराष्ट्र राज्यस्तरीय गोळा फेक (shot put) आणि थाळी फेक (discus throw) स्पर्धेसाठी लाल बहादूर शास्त्री विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बाबूळवाडाची कु.तृप्ती मानवटकर यांची निवड..

    कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशिवनी 

पारशिवनी:- महेंद्र एज्युकेशन सोसायटी,नागपूर द्वारा संचलित लाल बहादूर शास्त्री विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बाबूळवाडा,तालुका – पारशिवनी,जिल्हा-नागपूर येथील वर्ग 12 वी विज्ञान शाखे ची विद्यार्थिनी कु. तृप्ती मानवटकर ही चंद्रपूर येथे झालेल्या विभागिय स्तरावरील मैदानी स्पर्ध मध्ये Under-19 वयोगटामधून गोळाफेक (shot put) या इव्हेंटमध्ये प्रथम क्रमांक व थाळी फेक (Discus throw) या इव्हेंट/स्पर्धे मध्ये दुसरा क्रमांक पटकावण्यात यशस्वी झालेली आहे.

          यामुळे तिची निवड आता पुढे नवंबर महिन्यात होणाऱ्या महाराष्ट्र राज्यस्तरीय गोळा फेक (shot put) आणि थाळी फेक (discus throw) स्पर्धेसाठी झालेली आहे.

       विद्यार्थिनी कु.तृप्ती मानवटकर तीने आपल्या यशाचे श्रेय आपले आई वडील,तसेच महेंद्र शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हिरामणराव बावनकुळे, उपाध्यक्ष सौ.कुसुमताई बावनकुळे आईसाहेब,सचिव श्री.पंकजराव बावनकुळे,लाल बहादुर शास्त्री विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य सौ.आर.आर.उखरे मॅडम,क्रीडा शिक्षक श्री.टाले सर,क्रीडा स्पर्धा मार्गदर्शक श्री.राठोड सर तसेच शाळेतील सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांना दिले.

          पुढच्या महिन्यात नोव्हेंबर मध्ये होणारे राज्य स्तरीय गोळाफेक व थाळीफेक स्पर्धांसाठी उपस्थितीनी कु.तृप्तीला शुभेच्छा दिल्यात.