करंजेकर अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालयाने आंतरमहाविद्यालयीन महिलांच्या खो-खो स्पर्धेत विजेतेपद पटकावले.

ऋग्वेद येवले

  उपसंपादक

दखल न्युज भारत 

साकोली : बाबासाहेब आंबेडकर तंत्रनिकेतन, लोणारे यांच्यावतीने आयोजित नागपूर विभागीय आंतरमहाविद्यालयीन खो-खो स्पर्धा ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालय, नागपूर येथे पार पडली.

            यामध्ये शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय यवतमाळ व करंजेकर अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालय, साकोली यांच्यात अंतिम स्पर्धा झाली. त्यात करंजेकर महाविद्यालयाने शासकीय महाविद्यालयाचा पराभव करून विजेतेपद पटकावले करंजेकर अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालयात विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जातो.

          संस्थापक अध्यक्ष डॉ. ब्रह्मानंद करंजेकर, संस्थेच्या सचिव डॉ. वृंदाताई करंजेकर, संस्थेचे अध्यक्ष डॉ. सोमदत्त करंजेकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नागेंद्र डहरवाल, उपप्राचार्य प्रा. रोशन गायधने, क्रीडा प्रभारी प्रा.शुभम कापसे, डॉ. जितेंद्र कुमार ठाकुर व सर्व प्राध्यापक इतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.