जमनापूर कॉलनीचा साकोली नगरपरिषदेत समावेश करा :- ग्रामस्थ संतप्त… — दिवाळी तोंडावर ग्रामस्थांच्या घरील कचरा फेकण्याची समस्या,जनतेच्या पैशाची धूळधाण… 

ऋग्वेद येवले

  उपसंपादक

दखल न्युज भारत 

साकोली : आता गटग्रामपंचायत जमनापूर ( कॉलनी ) वासीयांनी अशी मागणी केली आहे की, “नवीन जमनापूर कॉलनी साकोली नगरपरिषद मध्ये समाविष्ट करा” कारण येथील ढिसाळ नियोजन व चुकीच्या पद्धतीने विकास करण्याची पद्धत ही जनतेसमोर आता डोकेदुखी ठरत आहे. दिवाळीपूर्वी कमेटीने विविध विकासकामांत खर्च दाखविला परंतु ते जनतेच्या मनासारखे झाले नाही कारण जनतेला विश्वासात न घेता हे कामे स्वमर्जीचे मालक बनून करीत यात गैरव्यवहार तर नाही अशी शंका नविन जमनापूर कॉलनीतील जनतेने केली आहे. 

        साकोली लागूनच जमनापुर हे गाव सध्या कचरा फेकण्याचे समस्यांसाठी वादाचा विषय बनला आहे. गावातील गटग्रामपंचायतने विकासाची दिशा अगदी चुकीच्या दिशेने ठरविली आहे असा आरोप केला जात आहे. गटग्रामपंचायत पाथरी अंतर्गत पाथरी, जमनापुर (जमनापुर कॉलनी) आणि खैरलांजी हे तीन गाव मिळून ग्रामपंचायत आहे.

          गटग्रामपंचायतचे कोणतेही कामे करतांनी सरपंच आणि उपसरपंच यांनी गावाच्या विकासाच्या दृष्टीकोनातून योग्य तो निर्णय द्येऊन ग्रामपंचायत अंतर्गत करण्यात येणाऱ्या कामाच्या बाबतीत नियोजन करायला पाहिजे. परंतु गटग्रामपंचायत सरपंच आणि उपसरपंच यांनी जनते कडून येणाऱ्या टॅक्स पैशाची विल्हेवाट कशी लावावी आणि शासकीय पैशाचा कशाप्रकारे दुरुपयोग करायचे याचे प्रत्यक्षात उदाहरण १० लक्ष रुपये खर्च करून कचरा फेकण्याच्या दोन गाड्या खरेदी करून कामाच्या बाबतीत दिले आहे.

           मागील दोन महिन्यापूर्वी विकासाची कामे दाखविण्यासाठी १० लक्ष रुपयाचे दोन कचरा गाडी विकत घेतली आणि लोकांना हे दाखविण्याचा प्रयत्न केला की, ग्रामपंचायत ही गावातील जनतेच्या हितासाठी आहे. त्याच सोबत जमनापुर कॉलनीतील लोकांना कचरा बादल्या उपसरपंच यांनी चौका चौकात वाटल्या आणि कॉलनीतील लोकांना ग्रामपंचायतने विकासाचे फार मोठे काम केले हे दाखवून दिले.

           परंतु झाले मात्र उलटेच, पाथरी गटग्रामपंचायत जमनापुर, पाथरी तसेच खैरलांजी येथील कचरा टाकणार कुठे.? याचे अगोदर नियोजन करायला पाहिजे होते आणि त्यानंतर कचरा गाडीसाठी चालकाची नेमणूक करीत पूर्ण व्यवस्था झाल्यानंतर १० लक्ष रुपयांची कचरा गाडी विकत द्यायची होती. परंतु ग्रामपंचायत सरपंच आणि उपसरपंच यांनी याबाबतीत कुठल्याही प्रकारचे पूर्व नियोजन केले नाही आणि १० लक्ष रुपये खर्च केले. आता कचरा गाडी १० लक्ष रुपयाची विकत घेतली आणि दोन महिन्यापासून त्याचे नियोजन नाही. सध्या दोन गाड्या गटग्रामपंचायत मध्ये धूळखात पडल्या आहे.

           ग्रामपंचायत सरपंच आणि उपसरपंच यांनी कचरा समस्या सोडविण्यासाठी आता साकोली नगरपरिषदकडे “घनकचरा विलगिकरण केंद्र” येथे कचरा टाकू द्या असे पत्र दिले. आणि मदत मागितली की जमनापुरचा कचरा साकोलीमध्ये टाकू द्या. याची पुष्टी नगर परिषद साकोली कडून झाली आहे. या पत्रात पाथरी ग्रामपंचायत सरपंच यांची सही आहे. साकोली नगर परिपद ने पाथरी ग्रामपंचायत अंतर्गत तीन गावातील कचरा साकोली नगर परिषदेच्या हद्दीत घेण्यास स्पष्टपणे नकार दिला.  

            दिवाळीच्या अगदी तोंडावर ही समस्या ग्रामपंचायतच्या चुकीच्या दिशेने काम करण्याच्या पद्धतीमुळे तयार झाली आहे. त्यामुळे जमनापुर कॉलनी वासियामध्ये अतिशय संतापाची लाट पसरली आहे. जमनापुर कॉलनीतील जनता दररोज एकत्र जमा होऊन चर्चा करीत आहे. ग्रामपंचायतवर नाराज असलेली जनता जमनापुर कॉलनीला साकोली नगरपरिषद मध्ये समाविष्ट करण्याची भाषा बोलत आहे. पाथरी गटग्रामपंचायत मध्ये सर्वात जास्त घर कर जमनापुर कॉलनीतून मिळत आहे त्यामुळे जमनापुर कॉलनी वासियाची ग्रामपंचायत कडून अपेक्षा फार मोठया प्रमाणात वाढल्या आहे.

                परंतु ग्रामपंचायत सरपंच आणि उपसरपंच यांचे गटग्रामपंचायतचे काम करतांनी कामाचे कोणतेही नियोजन न करता स्वतःचे काम दाखविण्यासाठी जनतेच्या कर पैशाची आणि शासकीय पैशाची चुकीच्या दिशेने विल्हेवाट लावत आहे. प्रशासनाने याची योग्य दखल द्यावी आणि जनतेला न्याय मिळवून द्यावा यासाठी जमनापुर कॉलनी साकोली नगरपरिषद मध्ये समाविष्ट करावी अशी मागणी जमनापूर कॉलनीत जोर धरू लागली आहे.